नगर महापालिका रणसंग्राम : भरारी पथकांची निवडणूक हालचालींवर नजर

गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

नगर – महापालिकेची निवडणूक पहिल्यापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे वापरले जाण्याची शक्‍यता आहे. लक्ष्ती दर्शनाचा लाभही होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनातर्फे भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सहा कार्यालय असून प्रत्येक कार्यालयासाठी एक पथक नियुक्‍त करण्यात आले आहे. या भरारी पथकाची करडी नजर राहणार असून कोण काय करते. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर लक्ष राहणार आहे.

महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली असून आचारंसहितेचा भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रत्येक भरारी पथकात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पथकाला स्वतंत्र वाहन देण्यात आले असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही भरारी पथक शहर पिंजून काढत आहे.

शहरातील विविध प्रभागात जावून गल्ली बोळामधून हे पथक टेहाळणी करीत आहे. वाहनांच्या दर्शनी काचेवर तसेच पाठीमागील काचेवर महापालिका निवडणूक भरारी पथक असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हे भरारी पथकाचे वाहन सहज ओळखू येणार आहे.

या पथकांची वाहने शहरात फिरतांना दिसत असून नागरिकांचेही याकडे लक्ष जात आहे. शहरात निवडणुकीच्या कालावधीत होणारा पैशांचा वापर व इमर गैरप्रकारांना चाप लावण्याची जबाबदारी भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या पथकाकडून दिवसभराचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येतो. अद्यापपर्यंत गैरप्रकार झाले नसल्याने पथकाकडून कारवाई झाली नाही.

मात्र, आचारसंहितेच्या तक्रारी मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहे. अर्थात या तक्रारी राजकीय स्वरूपाच्या आहेत. या भरारी पथकाला देण्यात आलेली बहुतांशी वाहने ही जिल्ह्याबाहेरील आहे. निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यातून येणार निधी, उमेदवारांकडून मतदारांना आमिष दाखविणे, पैशाचे वाटप करणे, दारूची वाहतूक यासह मतदारांना अन्य आमिषे दाखवून त्यांना आकर्षित करण्याच्या प्रकाराला चाप लावण्याचे काम हे पथक करणार आहे. या पथकांकडून अद्याप एकही कारवाई झालेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)