नगर महापालिका रणसंग्राम : प्रभाग विस्ताराने झाली उमेदवारांची दमछाक

प्रचार व गाठीभेटींचे नियोजन कोलमडले

नगर – महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. परंतू आता प्रभागाचा विस्तार वाढल्याने प्रचार व गाठीभेटी घेतांना दमछाक होत आहे. मोठा प्रभाग असल्याने नेमकी कोठून सुरुवात करावी, कोणला भेटावे हा घोळ तर उमेदवारांचा सुरू आहे. पण काही मतदार अन्य प्रभागात गेल्याने त्यांचे नियोजन कसे करावे या संभ्रमात उमेदवार असल्याने सध्या प्रचार व गाठीभेटींची नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी येत्या 9 डिसेंबरला मतदान होत आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मंगळवारी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जाहीर प्रचारला सुरूवात होणार आहे. परंतू पक्षाची उमेदवारी जाहीर झालेले तसेच यापूर्वीच उमेदवारी आपल्याला मिळणार हे माहित असल्याने अनेक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या.

यंदा प्रभाग रचनेचा विचार करता विस्तार वाढला आहे. तब्बल 20 हजार लोकसंख्येचा प्रभाग झाला असून मतदारांची संख्या देखील 13 हजारच्या जवळपास आहे. या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

प्रभाग विस्तार तसे एक प्रभागात चार सदस्य राहणार आहे. त्यामुळे पक्षीय उमेदवारांनी चार जणांचे मंडळ तयार केले असून प्रत्येकाने भाग वाटून घेवून प्रचार करण्याचे ठरविले आहे. परंतू या उमेदवाराला सर्वांची मते आवश्‍यक असल्याने त्याला प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे झाले आहे. यात वेळ कमी असल्याने प्रचार व गाठीभेटी घेणे अवघड होत आहे. गाठीभेटींमध्ये बराच वेळ खर्च होता. चहा पाण्यासाठी वेळ द्यावा लागतो. यात संपूर्ण प्रभागात प्रचार करणे जिकीरीचे झाले आहे. त्यात हा भाग एका बाजूला तर तो भाग दुसरीकडे आहे. त्यात अर्जा माघारीसाठी सध्या प्रयत्न चालू असल्याने त्यासाठी वेळ खर्च होत आहे.

आज रविवार असल्याने उमेदवारांनी सुट्टीची पर्वणी साध्याचा प्रयत्न केला. बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून मतदारांपर्यंत पोहचण्याची आजची संधी सोडली. जाहीर प्रचाराला तशी सुरूवात झाली नसली तरी कार्यकर्त्यांचा घोळका घेवून उमेदवारांनी घरोघरी जावून प्रचार केला. उद्यापासून वाहनांची परवानगी, सभाचे नियोजन त्यांच्या परवानग्या द्यावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. परंतू ती कामे झाली की नाही. हे पाहावे लागत आहे.

अर्थात प्रभागाचा विस्तार उमेदवारांसाठी अडचणीचा ठरला आहे. एवढ्या मोठ्या प्रभागात फिरतांना चांगलीच दमछाक होत आहे. लहान प्रभाग असतांना आतापर्यंत तीन ते चार फेऱ्या झाल्या असता. पण आज एक फेरी पूर्ण करण्यासाठी दोन दिवस द्यावे लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)