नगर महापालिका रणसंग्राम : उमेदवारांकडून पक्षनिष्ठा टांगल्या वेशीवर!

नगर – महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवसापासूनच चुरस दिसून येत आहे. सर्व उमेदवार निवडणूक जिंकायचीच, या निश्‍चयाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आज अमूक पक्षात आसलेला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्ष कार्यालयलात दिसत होता. अर्ज दाखल करताना तिसऱ्याच पक्षाकडून दाखल करत होता. त्यामुळे उमेदवारांकडून पक्षनिष्ठा आता वेशीवर टांगल्याचेच दिसून येते आहे.

महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. काहींनी पक्षाने उमेदवारी नाही दिली, तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काहींनी उमेदवारीसाठी पक्षच बदलले आहेत. भविष्याचा वेध घेत अनेकांनी पक्षांतरे केली आहेत. अनेक उमेदवारांनी प्रभागाचा अभ्यास करून कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल, याचा अभ्यास करून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

तर काहींनी सध्या असलेल्या पक्षाद्वारे उमेदवारी मिळणार नसल्याचे पाहून तत्काळ दुसऱ्या पक्षात उडी घेतली होती. सकाळी एका पक्षात असलेला उमेदवार अचानक रात्री दुसऱ्या पक्षात दिसत होता. उमेदवारी अर्ज भरतानाही सकाळी एका पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. मात्र ऐनवेळी दुसऱ्याच पक्षाचा अर्ज भरला, असे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत आता पक्षनिष्ठेला कुठलीच किंमत उरली नसल्याचे दिसून येते.

पूर्वी कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ होते. पक्षाची विचारधारा जनसामान्यांत नेण्याचे महत्त्वाचे काम कर्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी करत होते. मात्र आता कार्यकर्तेही ज्या पक्षाकडून आपल्याला फायदा मिळेल, तिकडे वळू लागले आहेत. उमेदवारही आपल्याला ज्या पक्षाचा फायदा होईल, याची गणिते मांडून उमेदवारी मागतानाही दिसत आहेत.

त्यामुळे आजच्या काळात पक्षनिष्ठा ही झूट असल्याचेच या उमेदवार व कार्यकर्त्यांच्या वागण्यातून जाणवत आहे. जे उमेदवार आपल्या पक्षाशी निष्ठा ठेवू शकत नाहीत, ते मतदारांशी काय निष्ठा ठेवणार व जनतेची कुठली कामे मार्गी लावतील, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)