नगर महापालिका रणसंग्राम : माघारी ठरतंय राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी

भाजपच्या नेत्यांपुढे कडवे आव्हान; समजूत काढण्यात वेळ खर्च

नगर – उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आता माघारीचे मोठे आव्हान सर्व राजकीय पक्षांसमोर उभे राहिले आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी स्वतः उमेदवार किंवा त्याचे सुचक आवश्‍यक आहे. परंतू सध्या दोघेही नॉटरिचेबल असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. जे काही उमेदवार आहे. त्यांची समजूत काढण्यात नेत्यांसह कार्यकर्त्यांचा वेळ खर्च होत आहे. त्यासाठी विविध अमिषे दाखविण्यात येत असून काही ठिकाणी तर अक्षरशः माघारीसाठी लक्ष्मी दर्शन देखील घडवावे लागत आहेत.

महापालिकेच्या 68 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी तब्बल 715 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्थात बहुतांशी उमेदवारांनी तीन ते चार अर्ज दाखल केल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यात भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 असे सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे.

या निर्णयामुळे भाजपला मोठा दणका बसला आहे. त्यातून सावत नाही तोच आता ज्या प्रभागात पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत रिंगणात उतरले आहे. त्यांच्या माघारीसाठी आता प्रयत्न करावे लागत आहे. अर्थात बुधवारपासून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांनी माघारीसाठी खटाटोप करू केला आहे. विशेषतः भाजपकडे उमेदवारीसाठी वाढलेली गर्दी लक्षात घेता अनेकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

68 जागांसाठी 284 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी आपल्याच मिळणार या विश्‍वासाने अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतू पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर अनेकांचा हिरमुड झाला आहे. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आता अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळ भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीमध्ये काही प्रभागात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून ऑपरेशन चालू आहे. प्रभाग मोठे झाल्यानंतरही मोठ्या संख्येने अर्ज आले आहे. त्यामुळे आता कोणी थांबण्यात तयार नसल्याचे त्यामुळे पक्ष नेते अडचणी सापडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ड्रमेज कंट्रोलचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. काही उमेदवार आपला भाव वाढविण्यासाठी मोबाईल बंद करून नगर शहराच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे अशांचा तपास लागत नसल्याने उमेदवार आता गॅसवर आले आहे.

अर्थात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उमेदवार बंडखारे करणाऱ्या उमेदवारवर लक्ष ठेवून आहेत आहे. त्यांच्या बारीकसारीक हालचाली पाहून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या उमेदवारामुळे प्रतिस्पर्धी अडचणीत येणार आहे त्याला उमेदवारी ठेवण्याचा आग्रह धरला जात असून त्याचा निवडणूक खर्च करण्याचे अमिषे दाखविण्या येत आहे.

काही केवळ मत खाण्यासाठी तसेच मत विभाजनासाठी रिंगणात उतरतात. अशांची माघारी राजकीय पक्षांसाठी खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरत आहे. त्यांना विविध अमिषे दाखविण्यात येतात. त्यातून लक्ष्मी दर्शन देखील घडविण्यात येते. त्यामुळे हा भाव देखील चांगलाच वाढला असून माघारीसाठी पक्षाच्या उमेदवाराला 5 ते 10 लाख रुपये खर्च करावे लागत आहे. त्यात भाजपने निष्ठावंतांना डावलून उमेदवारी देण्यात आल्याने अनेक निष्ठावंत रिंगणात उतरण्याच्या मनस्थिती आहे. त्यांना शांत करण्यासाठी थेट पक्षाच्या वरिष्ठांसह मंत्र्यांचा वापर करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)