नगर महापालिका रणसंग्राम : गरज भासते तेथे आ. कर्डिले सक्रिय

खा. दिलीप गांधी : एकही जागा मोकळी राहणार नाही

नगर – महापालिका निवडणुकीत ज्या ठिकाणी गरज लागणार आहे तेथे आमदार शिवाजीराव कर्डिले सक्रिया होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वच नेत्यांचा वापर होत असल्याचे खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी स्पष्ट केले.

महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उद्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, सरचिटणीस आ. सुजितसिंग ठाकूर आदी उपस्थित राहणार आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे. असे असले तरी भाजप सर्वांच्या सर्व 68 जागा लढणार असून एकही जागा मोकळी राहणार नाही असे सांगून खा. गांधी म्हणाले, वेळ पडली तर उमेदवार पुरस्कृत करण्यात येणार आहे.

नगरचे जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी चांगले काम करत आहेत मात्र त्यांचे खालचे अधिकारी त्यांच्याप्रमाणे नाहीत. निवडणुकीसाठी उमेदवारांना, पक्षांना बारीक सारीक गोष्टींसाठी तसेच परवाग्यासाठी सहकार्य न करता अधिकारी वेठीस धरत आहेत. आधीच किचकट फॉर्म प्रक्रियामुळे उमेदवारांचा भरपूर वेळ वाया गेला आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या परवाग्यासाठी प्रशासनाने ताबडतोब एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी आहे.

केडगाव येथे झालेल्या पक्षप्रवेश बद्दल बोलताना खा. गांधी म्हणाले, भाजपच्या कोअर कमिटीने व सर्वांच्या संमतीने केडगाव बाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पक्षाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांची समजूत काढली आहे. भाजपच्या स्थापनेनंतर प्रथमच महापालिकेच्या सर्वांच्या सर्व जागांवर पक्षाने उमेदवार दिले आहेत.

पक्षाची ताकद शहरात वाढली असून प्रत्येक प्रभागात उमेदवार देणे म्हणजे पक्षसंघटन मजबूत झाल्याचे प्रतीक आहे. यावेळी शहर सरचिटणीस किशोर बोरा यांनी प्रास्ताविक केले. गौतम दीक्षित यांनी आभार मानले. यावेळी जगन्नाथ निंबाळकर, श्रीकांत साठे, सुनील काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)