नगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेसाठी आतापर्यंत 222 अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

नगर  – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या आदल्या दिवसापर्यंत 222 उमेदवारी अर्ज दाखल झाले. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तसेच ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडणार आहे. त्यामुळे सहाही निवडणूक कार्यालयात उद्या जत्रेचे स्वरूप येणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी दि. 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्र्रक्रिया सुरू झाली असून उद्या दि. 20 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निहाय उमेदवार अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. आज झालेले दाखल अर्ज ः सावेडी 1 प्रभाग 1,6, 7 मधून 24, सावेडी 1 प्रभाग 2, 4, 5 मधून 23, शहर 1 प्रभाग 3, 9, 10 मधून 22, शहर 2 प्रभाग 8,11, 12 मधून 27, बुरुडगाव प्रभाग 13, 14 मधून 12 तर केडगाव प्रभाग 15, 16, 17 मधून 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पहिल्या दिवशी दि. 13 रोजी बुरुडगाव कार्यालयात 1 अर्ज दाखल झाला. दि. 16 रोजी सावेडी 1 मधून 11, शहर 1 मधून 3, शहर मधून 3, बुरुडगावमधून 9, केडगावमधून 7 असे 33 अर्ज दाखल झाले आहेत. तर दि. 17 रोजी सावेडी 1 मधून 21, सावेडी 2 मधून 1, शहर 1 मधून 8, शहर 2 मधून 12, बुरुडगावमधून 4 तर केडगावमधून 15 असे 61 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यात ऑलनाईन अर्ज दाखल करतांना अनेक अडचणी येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मागणी केली होती. त्याला निवडणुक आयोगाने मान्यता दिल्याने आज 127 अर्ज दाखल झाले. उद्या त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)