नगर महापालिका रणसंग्राम 2018 : भाजपचे ‘ते’ प्रवेश अडचणीत

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर निवडणूकीची धुरा; कोअर कमिटी ठरणार नावालाच

भाजप इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती

भाजप इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. 68 प्रभागांसाठी या मुलाखती होणार आहे. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून पक्षाकडून इच्छुकांना अर्ज देण्यात आले असून त्याअर्जापोटी पक्ष निधी देखील घेण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार शुल्क आहे. परंतू कोअर कमिटीमधील एका सदस्याने दहा हजार रुपये घेतल्याची चर्चा असून त्याने बोभाटा झाल्यानंतर 15 इच्छुकांचे पैसे परत केल्याची चर्चा आहे.

नगर – महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्थापन केलेली कोअर कमिटी नावालाच ठरणार आहे. या निवडणुकीची सर्वच धुरा आता पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या कमिटीतील सदस्यांना आता पालकमंत्र्यांच्या धोरणानुसार निर्णय द्यावे लागणार आहे.

दरम्यान कोअर कमिटीमध्ये पालकमंत्र्यांसह अन्य चार जणांचा समावेश आहे. परंतू या कमिटीला डावलून घडवून आणलेले पक्षप्रवेश आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी तीन ते चार महिन्यापासून भाजपने निवडणूक तयारीला लागले आहे. सांगली व जळगाव पाठोपाठ नगरची महापालिका ताब्यात आणण्याचा चंग बांधला आहे.

स्थानिक नेत्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच मुख्यमंत्री स्वतः जातीने या निवडणुकीकडे लक्ष देत आहे. त्यासाठी पालकमंत्री शिंदे यांच्यासह शहरजिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ऍड. अभय आगरकर, किशोर बोरा या पाच जणांचा कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे.

अन्य पक्षातून भाजप प्रवेश, उमेदवारी, सभा आदींचे नियोजन करण्याची जबाबदारी या कमिटीवर आहे. परंतू या कमिटीला डावलून कोअर कमिटीतील एका सदस्याने अनेकांना उमेदवारीचे आश्‍वासन देवून अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश घडवून आणले आहेत. अर्थात ज्या प्रवेश प्रक्रियेत पालकमंत्री सहभागी आहे. ते वगळून जे प्रवेश आजवर झाले आहेत. ते आता अडचणी येण्याची शक्‍यता असून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे.

काही प्रभागात पक्षाचा उमेदवार असतांनाही स्वतःच्या मनमानीमुळे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून त्यांना उमेदवारीचे आश्‍वासन देण्यात आले आहे. परंतू आता त्यांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्‍न आहे. कारण भाजपने सर्वाधिकार पालकमंत्र्यांना दिले आहे.

पक्षाची महापालिकेत सत्ता आणण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांवर पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी काढली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पालकमंत्री प्रयत्न करणार आहे. त्याचा परिणाम अन्य सदस्यांवर होण्याची शक्‍यता आहे. जळगावमध्ये जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार नगरमध्ये पालकमंत्र्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्र्यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)