राष्ट्रवादीच्या मुलाखतींसाठी ‘तारीखे पे तारीख’

मुलाखतींसाठी बुधवारचा मुहूर्त : आघाडीच्या निर्णयाकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष

नगर  – महापालिकेच्या निवडणुकींची राजकीय पक्षांसह इच्छुकांची घाई सुरू झाली आहे. “पक्ष नाही, तर अपक्ष’, असा विचार करून काहींनी प्रचारात जोर दाखवित आहेत. शिवसेनेने 32 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने मुलाखती सुरू केल्या. यात सर्वात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मागे राहिले आहेत. नियोजनाबाबत नेहमीच तत्पर असलेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतींची तारीख मात्र दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे.

त्यामुळे “तारीख पे तारीख’, असे कुठपर्यंत, असे कार्यकर्ते म्हणू लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने यादी दखल घेत आता बुधवारी (ता. 14) इच्छुकांच्या मुलखाती घेण्याचे निश्‍चित केले आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी तसे संदेश देखील व्हायरल केले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यास उद्या मंगळवारपासून सुरूवात होत आहे. इच्छुकांनी त्यानुसार अर्ज भरण्याचे देखील नियोजन केले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून “विनिंग’ उमेदवाराचीच चाचपणी सुरू आहे. शिवसेनेने 32 उमेदवारांची यादी जाहीर करून तयारीत आघाडी घेतली आहे.

भारतीय जनता पक्षाने आज इच्छुकांच्या मुलाखती घेऊन नावे बंद पाकिटात ठेवली आहेत. राष्ट्रवादीतर्फे मुलाखतींचे नियोजन करण्यात आले होते. सोमवारी तसे नियोजन होते. परंतु वरिष्ठ नेत्यांच्या वेळापत्रकानुसार या मुलाखतींची तारीख पुढे गेली. राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी ही तारीख उद्या मंगळवारी असेल असे सांगितले होते. म्हणजेच उद्याचे मुलाखतींचे नियोजन होते. परंतु या तारखेत देखील बदल झाला आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीसाठी बैठका चालू आहेत. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. मुलाखतींचे नियोजन पूर्ण आहे. कार्यकर्ते संपर्कात आहे. मुलखाती होताच, शहरात राष्ट्रवादीचे लाट दिसेल.
– प्रा. माणिकराव विधाते शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी मुलाखतींची निश्‍तिच तारीख आणि वेळेचा संदेश समाज माध्यमांवरून सायंकाळी व्हायरल केला आहे. यानुसार बुधवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता नगर-पुणे रोडवरील राष्ट्रवादी भवन येथे मुलाखती होतील, असे या संदेशात सांगितले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुलाखतींची “तारीख पे तारीख’ पडत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या मुलखती पुढे ढकलल्या जात असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीसंदर्भात याच दिवशी मंगळवारी मुंबई येथे वरिष्ठ नेत्यांची बैठक रंगणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील याच दिवशी आहेत. बैठक आणि मुलाखतींकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आघाडी संदर्भातील ही बैठक “फायनल’ असणार आहे. राष्ट्रवादीने जागांसंदर्भात कणखर भूमिकेत आहे. यामुळे कॉंग्रेसने काहीशी माघार घेतल्याचेही समजते. आघाडी झाल्यास राष्ट्रवादीला उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे मात्र निश्‍चित!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)