नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : उमेदवारांसाठी प्रशासनाकडून ‘ट्रू व्होटर ऍप’चे उद्या प्रशिक्षण

नगर – महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी प्रशासनाने “ट्रू व्होटर ऍप’ (True Voter) चे सोमवारी (ता. 19) प्रशिक्षण ठेवले आहे. हे प्रशिक्षण औरंगाबाद रोडवरील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील राजमाता जिजाऊ प्रशिक्षण सभागृहात दुपारी चार वाजता सुरू होईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

महापालिकेच्या निवडणुकासंदर्भातील विविध सुविधा, माहिती व सहाय्य तातडीने उपलब्ध व्हावे यादृष्टिने राज्य निवडणूक आयोगाने “ट्रू व्होटर ऍप’ विकसित केले आहे. हे ऍप इच्छुक उमेदवारांसाठी लाभदायक असेच आहे. त्याचे प्रशिक्षण इच्छुक उमेदवारांना मिळाल्यास त्याचा फायदा त्यांना निवडणुकीसंदर्भातील माहिती सुलभपणे उपलब्ध करण्यासाठी होऊ शकतो.

मतदार यादी विभाजीत करणे, मतदान केंद्राचा नकाशा तयार करणे, मतदानाचा अहवाल तयार करणे, मतदानाची आकडेवारी देणे, मतदारांना मतदार यादीतील आपले नाव व मतदान केंद्र शोधण्याची सुविधा, मतदान केंद्रावर जाणेसाठी गुगल मॅपद्वारे मागक्रम करता येणार आहे.

त्याचप्रमाणे, उमेदवारांना निवडणूक खर्चाची माहिती या ऍपद्वारे सादर करणे, उमेदवारांना शपथपत्रामध्ये भरलेली माहिती मतदारांना पाहता येते. उमेदवारांनी दाखल केलेला निवडणूक खर्च व निवडणुकीचा निकालही पाहता येतो, या ऍपद्वारे उमेदवारांना आपले प्रोफाईल तयार करून दैनंदिन खर्च सुटसुटीतपणे नोंदविता येणार आहे.

या ऍपमधून नमुना 1, 2, व 3 पीडीएफ स्वरूपात प्राप्त करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्‍यक आहे. असे हे प्रशिक्षण असणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, सेवाभावी संस्थानांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)