महापालिकेसाठी अडीच लाख मतदार

प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक तर प्रभाग 1 मध्ये सर्वात कमी मतदार

नगर – महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रारूप मतदार यादी आज गुरूवारी(दि.25) मतदारांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार तयार करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी असून ,राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 सप्टेंबरची नगर शहर विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राह्य धरुन त्याआधारे महापालिका हद्दीतील 2 लाख 56 हजार 719 मतदारांचा समावेश असलेल्या 17 प्रभागांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यात प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक मतदार असून, प्रभाग 1 मध्ये सर्वात कमी मतदार संख्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 ऑक्‍टोबरला प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मनपाने नगर शहर विधानसभा मतदारसंघाची 1 सप्टेंबरपर्यंतची मतदार यादी मनपा निवडणुकीसाठी ग्राह्य धरुन प्रारुप मतदार यादी तयार केली आहे.

विधानसभा मतदारसंघात 2 लाख 76 हजार 131 मतदार आहेत. यातील नवनागापूर, बुरुडगावरोड व भिंगार हद्दीतील 19 हजार 412 मतदार वगळून महापालिका हद्दीची 2 लाख 56 हजार 719 मतदारांचासमावेश असलेली यादी तयार करण्यात आली आहे.

17 प्रभागांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या महापालिकेने तयार केल्या आहेत. या मतदार याद्यांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासह चारही प्रभाग कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांनी या याद्या तपासून आपली नावे आहेत किंवा नाहित याची खात्री करणे , नावात दुरूस्ती असल्यास तशी हरकत नोंदविणे यासाठी 6 दिवसांची मुदत देण्यात आली असून 31 ऑक्‍टोबर पर्यंत येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार आहे.

प्रभागनिहाय मतदार संख्या पुढील प्रमाणे :

प्रभाग क्रमांक 1 – 10751
प्रभाग क्रमांक 2 – 15670
प्रभाग क्रमांक 3 – 13609
प्रभाग क्रमांक 4 – 14691
प्रभाग क्रमांक 5 – 18630
प्रभाग क्रमांक 6 – 13278
प्रभाग क्रमांक 7 – 12832
प्रभाग क्रमांक 8 – 14934
प्रभाग क्रमांक 9 – 17712
प्रभाग क्रमांक 10 – 15740
प्रभाग क्रमांक 11 – 16388
प्रभाग क्रमांक 12 – 19118
प्रभाग क्रमांक 13 – 18783
प्रभाग क्रमांक 14 – 15325
प्रभाग क्रमांक 15 – 11649
प्रभाग क्रमांक 16 – 15314
प्रभाग क्रमांक 17 – 12295

मतदार याद्या तपासण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते कामाला लागले असून या निमित्ताने इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांचा आता मतदारांशी प्रत्यक्ष संबंध येत असून त्याद्वारे प्रचाराची पहिली फेरी देखील सुरू होत आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदारांशी संपर्कात येण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र सद्या पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)