नगर महापालिका रणसंग्राम : रावसाहेब दाणवे फुंकणार रणशिंग

भाजपच्या प्रचाराचा आज प्रारंभ 

नगर – महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भाजपने सर्व उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दाणवे यांच्या उपस्थितीत उद्या (रविवारी) भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. अहिल्यादेवी होळकर चौकात सायंकाळी सभा होणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

पहिल्यांदाच स्वबळावर लढणाऱ्या भाजपच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नगर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.

सायंकाळी चार वाजता त्यांचे पोलीस परेड ग्राऊंड येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन होणार असून तेथून ते माळीवाडा येथील विशाल गणपती मंदीरात जावून श्री विशाल गणेशाचे दर्शन घेणार आहेत. येथूनच भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असून गणेश मंदीरापासून मोटारसायकल रॅली निघाणार आहे. ही रॅलीद्वारे अहिल्यादेवी होळकर चौकात प्रस्थान करणार आहेत.

या रॅलीदरम्यान ते संपूर्ण शहरात फिरणार आहेत. यावेळी त्यांच्यासह भाजपचे इतर सर्व स्थानिक प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर चौकातच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून दानवे या सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर रात्री ते स्थानिक नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)