नगर महापालिका रणसंग्राम २०१८
नगर – महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकारणाशी निगडीत असलेल्या व्यक्तिंकडील शस्त्र जमा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्यांची कुंडली तयार करून ती प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केली जात असतानाच आता राजकीय व्यक्तिंकडे असलेले परवानाधारक शस्त्र हे निवडणूक कालावधीमध्ये ताब्यात घेण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत.
यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निवडणूक क्षेत्रातील संबंधित पोलीस ठाण्यांना शस्त्रधारकांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, सदर नावे दोन दिवसांत अंतिम करण्यात येणार आहे.
दरम्यान काही पोलीस ठाण्यांनी एकून परवानाधारकांची यादी सादर केली असता, त्यांना ती माघारी पाठवून निवडणूकीशी संबंधित व्यक्तिंची यादी सादर करण्याच्या नव्याने सूचना दिल्याचे समजते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा