नगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेत आता रंगणार तिरंगी लढत

शिवसेना, भाजप व दोन्ही कॉंग्रेस आघाडी आमनेसामने; प्रतीक्षा उमेदवार यादीची

नगर – कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने आता महापालिकेची निवडणूक तिंरगी होणार असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना व भाजप यांच्यात युतीची शक्‍यता पूर्णपणे मावळल्याने दोन्ही पक्ष आता आमनसामने लढणार आहेत.

महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना व भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी मध्यतंरी युतीची चर्चा सुरू होती. त्यादृष्टीने शिवसेनेने पाऊल उचलले होते. परंतू भाजपकडून युतीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेने पहिली 19 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात विद्यमान नगरसेवकांचा समावेश केला होता.

ही यादी जाहीर झाल्यानंतर तरी भाजप युतीचा विचार करेल. परंतू शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर भाजपने युतीचा विषय बंद केला. त्यानंतर शिवसेने लगेच दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने देखील पहिली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेनेने तिसरी यादी जाहीर करून युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत शिवसेनेने 51 उमेदवार जाहीर केले आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित होती. परंतू जागा वाटपाचा घोळ चालू होतो. या जागा वाटपात कॉंग्रेस फारसे न ताणता नरमाईची भूमिका घेतल्याने व राष्ट्रवादी देखील तेवढ्या जागांवर समाधान मानून निवडणूक रिंगणात उतरण्याचे कॉंग्रेसने ठरविल्याने आज आघाडीवर शिक्‍कमोर्तब झाले. त्यामुळे आता आघाडी, शिवसेना व भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)