नगर महापालिका रणसंग्राम: कोतकर कुटुंब निवडणूक रिंगणातून बाहेर 

सहभाग नसलेली पहिलीच निवडणूक 

नगर: महापालिका स्थापन झाल्यानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी शहरजिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या कुटुंबाचा सक्रिय सहभाग राहिला. लांडे खून प्रकरणात तुरूंगात असतांनाही निवडणुकीत रिंगणात कोतकर कुटुंब होते. कोतकरसह त्यांची तीनही मुले तुरूंगात असतांना सुन सुवर्णा कोतकर यांनी केडगावाची खिंड लढविली. मात्र यावेळी कोतकर कुटुंबातील एकही सदस्य निवडणूक रिंगणात तर नाही पण नेतृत्व करण्यासाठी देखील राहिला नाही. अशी ही पहिलीच निवडणूक होत असून केडगावकर आता काय भूमिका घेणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

महापालिकेच्या आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत केडगावमध्ये कोतकर आघाडीवर राहिले. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून केडगावची ओळख होती. भानुदाससह त्याचा मुलगा माजी महापौर संदीप हे दोघेही निवडणुक रिंगणात असत. त्यानंतर भानुदास हा महापालिका निवडणूक रिंगणातून बाहेर गेला. त्यानंतर त्याची सुन व संदीप याची पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर या रिंगणात आल्या. त्यांनी निवडणुकीचे नेतृत्व केले. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत संदीप तुरुंगात असतांना प्रभाग क्रमांक 32 मध्ये निवडणुक लढला. सुवर्णा कोतकर यांनी या निवडणुकीतचे नेतृत्व करून आठपैकी सात जागा जिंकल्या होत्या. कोतकर कुटुंबातील एक सदस्य या निवडणुकीत रिंगणात असल्याने केडगावकरांनी त्यांच्या पारड्यात मताचे दान टाकले होते. लांडे खून प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आठ महिन्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत सुवर्णा कोतकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने विजय मिळविला होता. परंतू महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र आज कोतकर कुटुंबाचा एकही सदस्य निवडणुकीला उभा नाही. एवढे नाही तर या निवडणूक रिंगणापासून ते दूर गेले आहेत.

एप्रिलमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर झालेल्या दुहेरी हत्याकांडात सुवर्णा कोतकर यांचे नाव आल्यानंतर त्याही सध्या फरार आहेत. मागील निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. पण आज त्याही या निवडणुकीपासून दूर आहे. अशीही पहिलीच निवडणूक होत आहे. अर्थात कोतकर समर्थक निवडणूक रिंगणात आहे.त्यांनी निश्‍चित केलेले उमेदवार आहे. पण कोतकर कुटुंबचे नेतृत्व यावेळी नाही. त्यामुळे समर्थकांना कोतकर कुटुंबाचा सक्रिय सहभाग नसलेल्या या निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. त्यात कॉंग्रेसचे चिन्ह दर निवडणुकीत होते.पण यंदा कोतकरने कमळ हातात घेण्याचे आदेश दिल्याने त्याच्या सर्वच उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारून भाजपची उमेदवारी घेतली आहे.
या निवडणुकीत कोतकर कुटुंब नाही.तसेच चिन्ह देखील बदलले आहे. अशा स्थितीत कोतकर समर्थक उमेदवार निवडणुकीला समोरे जात असून केडगावकर यापूर्वीच्या निवडणुकीप्रमाणे कोतकरला मताचे दान टाकून कोतकरचा बालकिल्ला शाबुद ठेवणार का? अन्य पक्षाला संधी देणार हे आता 10 डिसेंबरला मतमोजणीनंतरच ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
5 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)