नगर महापालिका रणसंग्राम: भाजप-राष्ट्रवादीचे “सोधा’ राजकारण 

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसने कडेगाव उपनगर डावलून उमेदवार निश्‍चित केले आहे. पक्षाने 46 उमेदवारांची यादी निश्‍चित केली आहे. केडगाव येथील कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने तिथे उमेदवार दिलेले नाहीत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीत “सोधा’ राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीने 15 प्रभागांमध्ये 46 उमेदवार पक्षचिन्हावर निश्‍चित केले आहे. आता फक्त प्रचाराचा नारळ फोडण्याची तयारी उमेदवारांनी सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाने केडगावातील कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पक्षप्रवेश करून घेतला. हा राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू होते बुऱ्हाणनगरमधील आमदार शिवाजी कर्डिले. या भूकंपामुळे नगरचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीचा सूर आहे. असे असले तरी भाजप-राष्ट्रवादीचे “सोधा’ राजकारण हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी आघाडीची चर्चा केली. हे गुऱ्हाळ बरेच दिवस चालले. परंतु केडगावातील राजकीय भूकंप हा काही क्षणात झाला. आघाडी लांबलेल्या चर्चेत कॉंग्रेसचे अनेक निष्ठावन कार्यकर्त्यांना डावलले गेले. या कार्यकर्त्यांनी विखे यांच्यासमोर एकही चकार शब्द काढला नाही. परंतु भाजप-राष्ट्रवादीच्या “सोधा’ राजकारणावर आता हेच निष्ठावान कार्यकर्ते विखेंविरोधात सूर आवळू लागले आहेत.
भाजप-राष्ट्रवादीच्या “सोधा’ राजकारणात, राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 15 प्रभागात निश्‍चित केलेल्या 46 उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्याची तयारी सुरू केली आहे. केडगावचे राजकारणापासून या भूकंपानंतर राष्ट्रवादीने दूर राहण्याचे ठरविले आहे. आमदार संग्राम जगताप यांनीच उमेदवारांच्या प्रचाराच्या सूत्र हाती घेतले आहे. प्रभागनिहाय बैठका, चर्चा, चौकसभा आणि सभा असे नियोजन असणार आहे. राष्ट्रवादीबरोबर असलेल्या मित्रपक्षांनाही पक्षाचे चिन्ह मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रवादीने तीन जागा दिल्या आहेत. या उमेदवारांनाही राष्ट्रवादी पक्ष आपले चिन्ह देणार आहे.


दीपाली बारस्कर राष्ट्रवादीबरोबर 

शिवसेनेच्या नगरसेविका दीपाली बारस्कर प्रभाग एकमधून शिवसेनकडून निश्‍चित होत्या. शिवसेनेने त्यांना एबी फॉर्म देखील दिला होता. परंतु बारस्कर यांनी अखरेच्या क्षणी राष्ट्रवादीबरोबर गेल्या. राष्ट्रवादीने त्यांना एबी फॉर्म देखील दिला आहे. त्यामुळे बारस्कर या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 


दीप चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादी 

कॉंग्रेसचे प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे. दीप चव्हाण यांनी प्रभाग दहा, तर त्यांची पत्नी शीला यांनी नऊमधून अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीने नऊमध्ये उमेदवार दिलेला नाही. दीप चव्हाण यांच्याविरोधात प्रभाग दहामध्ये राष्ट्रवादीने जय भोसले यांना उमेदवारी दिली आहे. 


सुनीता मुदगल यांना “कात्रजचा घाट’ 

शिवसेनेच्या नगरसेविका सुतीना मुदगल यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मुदगल यांना प्रभाग 13 मधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्‍चित होती. तशी त्यांनी पक्षाकडे मुलाखत देखील दिली होती. मात्र राष्ट्रवादीने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून नीलम दांगट आणि सुनंदा जोशी यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने मुदगल यांना “कात्रजचा घाट’ दाखविल्याची चर्चा रंगली आहे. 


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)