केडगावकरांनी विखेंना दाखविला कात्रजचा घाट ; फोडाफोडीच्या राजकारणात भाजप अव्वल 

 नगरकरांच्या राजकारणापुढे टेकले हात ; फोडाफोडीच्या राजकारणात भाजप ठरली अव्वल 

नगर: कॉंग्रेसतंर्गत थोरात गटाचे कट्टर समर्थक म्हणून केडगावकरांची असलेली ओळख गेल्या काही वर्षांपासून विखे समर्थक झाली होती. तेव्हापासून केडगावकर विखेंच्या तालावरच खेळ होते. थोरात सोडून विखेंच्या गटात सामिल झाले तरी केडगाव कॉंग्रेसचा बालेकिल्लाच राहिला. लांडे खुन प्रकरणात कॉंग्रेसचे माजी शहरजिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्यासह त्याच्या तिन्ही मुलांना शिक्षा झाली तरी केडगावमधील त्यांचा दबदबा काही कमी झाला नव्हता. आजही केडगाव म्हटले की कोतकर असेच समिकरण राहिले आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे केडगावच्या आठ जागा यापूर्वीच खिश्‍यात घातल्या होत्या. डॉ. सुजय विखे यांनी केडगावकरांवर विश्‍वास टाकून आघाडीत राष्ट्रवादीबरोबर पुढील चर्चा केली होती. परंतू केडगाकरांनी भाजपची उमेदवारी घेवून विखेंना आज कात्रजचा घाट दाखविला.

एरवी विखे दक्षिणेतील लोकांना विळदचा घाट दाखवितात.परंतू केडगावकरांनी त्यांना कात्रजचा घाट दाखविल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून केडगावकर कॉंग्रेसबरोबर असल्याचे गृहीत धरण्यात आले होते. त्यांना गृहीत धरून कॉंग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडीत राष्ट्रवादीबरोबर चर्चा सुरू केली. भानुदास कोतकर हे सुरवातीला आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते.

कोतकर याच्या कार्यकाळात शहरात कॉंग्रेसचे अस्तित्वही अबाधित होते. परंतू लांडे खून प्रकरणानंतर कोतकर अडचणी आला. त्यानंतर थोरातांना सोडून कोतकर यांनी विखे गटाची कास धरली. तेव्हापासून कोतकर हे विखेंबरोबर होते. गेल्या महापालिका निवडणुकीतही विखेंच्या नेतृत्वाखालीच केडगावमध्ये कॉंग्रेस लढली. नुकत्याच झालेल्या केडगावमधील प्रभाग क्रमांक 32 च्या पोटनिवडणुकीत विखेंनी केडगाव प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर विखेंचे केडगावकडे जातीने लक्ष दिले जावू लागले. त्यामुळे कोतकर विखेंना सोडून कोणताही निर्णय घेणार नाहीत. अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

परंतू सोमवारी रात्री कोतकर याचा फतवा निघाला आली शहरात सर्वच उलथापालट झाली. या नगरच्या राजकारणामुळे विखे देखील चक्रावून गेले आहेत. त्यांनी अक्षरशः हात टेकले. कालपर्यंत आपल्याबरोबर असलेले अचानक भाजपमध्ये गेल्याने विखेंना मोठा धक्‍का बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
6 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)