घोषणा नको, प्रत्यक्ष वेतन द्या!

शिक्षक भारती संघटनेचा शिक्षणमंत्र्यांना कार्यवाही अल्टिमेटम

नगर  – शासननिर्णय रद्द होऊन आज 57 दिवस झाले. 1 हजार 628 शाळा व 2 हजार 452 वर्गतुकड्यांना नियमानुसार 100% वेतन अनुदान मिळावे यासाठी शिक्षक भारती संघटनेचे मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन चालूच आहे. तरी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून कार्यवाही होत नाही, हे दुर्दैवी आहे, अशी टीका शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी केली आह.

-Ads-

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलकांशी चर्चा केली. मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन, अनुदानाच्या अंमलबजावणी अधिवेशन संपेपर्यंत घोषणा करण्यात येईल. या धोरणाविषयी निर्णय जाहीर करा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यावर शिक्षक आमदार, प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधींची बैठक बोलावून निर्णय घेऊन अधिवेशनापूर्वी घोषणा करू, असे आश्‍वासन तावडे यांनी यावेळी दिले.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला राज्यप्रतिनिधी शकुंतला वाळुंज, ग्रथपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गाडगे, श्रीकांत गाडगे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तावडे यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची या मुद्यावर तिसरी बैठक झाली आहे. तावडे हे घोषणा करतो, बैठक लावतो, एवढेच आश्‍वास देतात. आंदोलन थांबवा अन्यथा देणार नाही, असेही तावडे यांनी बोलावून दाखविले.

अंशतः अनुदानित बांधवांच्या जीवनाशी खेळण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. घोषणा आणि आश्‍वासन देऊन बोळवन करणाऱ्यांना ओळखले पाहिजे. नुसती घोषणा नकोय प्रत्यक्षात 100% वेतन अनुदान मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शिक्षक भारती संघटनेने केल्याची माहिती सुनील गाडगे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)