विद्यार्थ्यांनी बनवल्या पर्यावरण पूरक गणपती मूर्ती

शहरटाकळी विद्यालयातील उपक्रम

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील एफ. डी. एल शिक्षण संस्थेच्या शहरटाकळी विद्यालयात पर्यावरण पुरक गणपती बनवणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या कल्पना शक्तीला व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेतून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शहरटाकळी ग्रामपंचायत सदस्य संदिप राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

प्राचार्य गणपत शेलार व कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे अध्यक्ष ऍड. अनिल मडके होते. तर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुनील गवळी, संदीप राऊत, राजेंद्र खंडागळे, रामप्पा गिरम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बरबडे, कोल्हे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या 127 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शाडुपासून सुबक गणपती मुर्ती बनवल्या. विद्यालयाचे कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांनी गणपती मुर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मान्यवरांच्या हस्ते पहिल्या सात उत्कृष्ट गणपती मुर्ती बनवणाऱ्या मुलांना बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सुरेश तेलोरे यांनी केले. तर आभार प्रा. ईश्वर वाबळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)