डिसेंबरमध्येच छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव

संग्रहित छायाचित्र.....

चारा टंचाईची भीषण स्थिती; जूनपर्यंत 750 छावण्यांची गरज; 800 कोटी खर्च लागणार

जयंत कुलकर्णी

2012 मध्ये साडेतीन लाख जनावरे छावणीत

सन 2012 मध्ये निर्माण झालेल्या टंचाई स्थितीत सुमारे 435 छावण्या उभारण्यात आल्या. या छावण्यामध्ये साडेतीन लाख जनावरे ठेवण्यात आली होती. यंदा मात्र यात वाढ होणार असून 750 छावण्याची नियोजन प्रशासनला करावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर – जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता आतापासून जाणवू लागली आहे.पावसाने ओढ दिल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगामात वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. गेल्या वर्षीचा चारा शिल्लक आहे. परंतू तो संपल्यानंतर जनावरे जगविण्यासाठी चारा छावण्या उभारण्याशिवाय पर्याय नाही. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या चाऱ्याचा विचार करता डिसेंबरमध्ये जिल्ह्यात काही मंडळातील गावांमध्ये छावण्या सुरू कराव्या लागतील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्‍त होत असून त्यानुसार छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

जिल्ह्यातील पशुधन वाचविण्याची मोठी जबाबदारी आता जिल्हा प्रशासनावर येवून पडली असून जिल्ह्यातील चारा संपल्यानंतर छावण्याच सुरू कराव्या लागणार आहे. डिसेंबरमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात जिल्ह्यातील 96 मंडळापैकी 26 मंडळांमध्ये चाराटंचाई भासणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने या 26 मंडळांमधील गावात छावण्या उभाराव्या लागणार आहेत. जुनपर्यंत जिल्ह्यात छावण्याची संख्या 750 होण्याची शक्‍यता असून त्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये लागणार आहेत. त्यादृष्टीने आतपासून जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

शासनाने जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ बुधवारी जाहिर केला आहे. त्यानुसार दुष्काळी उपाययोजना देखील राबविण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आढाव्यानुसार 22 लाख 56 हजार 874 मेट्रीक टन चार उपलब्ध होता. हा चारा पुढील चार महिने पुरेल अशी अपेक्षा होती. परंतू प्रत्यक्षात मंडळनिहाय पाहणी करण्यात आली असतांना सध्या जिल्ह्यात 14 लाख 30 हजार 940 मेट्रीक टन चार उपलब्ध आहे. हा चारा पुढील दोन महिने पुरले. परंतू काही तालुक्‍यात तर पुढील महिन्यात चारा टंचाई भासणार आहे. त्यात कर्जत, जामखेड, पाथर्डी व पारनेर या चार तालुक्‍याचा समावेश असून या चार तालुक्‍याव्यतिरिक्‍त सात मंडळांमधील काही गावांमध्येही चाराटंचाई भासणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात 250 छावण्याचा प्रस्ताव आहे.

जिल्ह्यात 13 लाख 18 हजार 706 मोठी जनावरे आहेत. त्यात बैल, गाय, म्हैस, घोडे आदींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला या जनावरांसाठी चारा 4 लाख 584 मेट्रीक टन लागतो. चाऱ्याची उपलब्धता पाहता छावण्याशिवाय पर्याय नाही. खरीपापाठोपाठ रब्बी हंगामा वाया गेल्याने यंदा चाराच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये चाराटंचाई भासणार आहे.
चौकट

शेळ्यांचा टंचाईत समावेश नाही

दुष्काळात मनुष्याप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचा विचार करण्यात येतो. बैल, गाय, म्हैस या जनावरांचा समावेश टंचाई करण्यात आला आहे. परंतू शेळ्यांचा समावेश झालेला नाही. जिल्ह्यात 10 लाख 15 हजार 191 शेळ्या आहेत. त्यांना 6 लाख 9 हजार 714 मेट्रीक टन चारा लागणार आहे. परंतू त्यांचा विचार टंचाई आराखड्यात झालेला नाही.

जिल्ह्याबाहेर चाऱ्याची विक्री

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्ह्याबाहेर चारा विक्रीला बंदी केली. हा आदेश होवून चार दिवस झाले आहे. परंतू आजही जिल्ह्यातील चारा शेजारच्या जिल्ह्यामध्ये विकला जात आहे. विशेषतः खरीप हंगामातील कडब्याचा शेतकऱ्यांना साठा केला आहे. परंतू जिल्ह्याबाहेरील व्यापारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून तो चारा विकत घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

सध्या ऊस एकमेव चारा

जिल्ह्यात सध्या तरी ऊस एकमेव चारा आहे. तो बाजारपेठे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणला गेला आहे. 1800 ते 2200 मेट्रीक टन भाव आहे. हुमणीमुळे तसेच पाण्याअभावी ऊस जळू जावू नये म्हणून कारखान्यांना देण्याची वाट न पाहाता शेतकरी ऊस बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)