भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील दहिगाव- ने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियामध्ये उत्कृष्ट काम केल्याने जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

दहिगाव-ने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 7 पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी दखल घेवून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे दहिगाव-ने प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करून डॉ. कानडे यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांचे दहिगाव-ने गाव असून त्यांचे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष असते. डॉ. कानडे यांचे माजी आमदार नरेंद्र घुले, कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सभापती क्षितिज घुले, साई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरूण पवार, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, विस्तार अधिकारी रामकिसन जाधव, सरपंच पांडुरंग मरकड, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, सेवा सोसायटी अध्यक्ष शब्बीर शेख, उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड, ग्रामसेवक गोटीराम मडके, शंकर मरकड, मठाचीवाडी सरपंच सतिष धोंडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)