नवनागापूरची बाजारपेठ फुलली

दुकाने थाटल्याने खरेदीला ग्राहकांची पसंती

नगर – नगर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवनागापूर या औद्यागिक वसाहतीजवळील गावामध्ये आवश्‍यक त्या वस्तू व कपड्याची दालने सुरू झाल्याने नागरिकांकडून येथील बाजारपेठेत खरेदीला पंसती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या नवनागापूर येथील बाजारपेठ फुलली आहे.

नगर-मनमाड रस्त्यावरील नवनागापूर गाव हे त्रिशंकू स्थिती होते. नव्याने ग्रामपंचायत झाल्यानंतर येथील बाजारपेठेला चालना मिळाली. आज नवनागापूर परिसरातील नागरिकांची मोठी बाजारपेठ झाली आहे. कपडे, फर्निचर, मोबाईल, मिठाई, वाहन आदींची मोठी दालने या ठिकाणी थाटण्यात आली आहेत. त्यामुळे गावात सर्व वस्तू व कपडे मिळत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहत आहे.

औद्यागिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या या कामगारांचे वेतन व बोगस झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक उतरला आहे. आर.के. कलेक्‍शन मोबाईल, सुविधा मार्केट कपडे, ओमशांती कलेक्‍शन कपडे तर इंडिया फर्निचर यासारखी दालने या परिसरात सुरू झाल्याने नागरिकांची सोय झाली आहे.

बाजारपेठे वाढली असली तरी येथील नागरिक समस्या सोडवणे आता अत्यावश्‍यक झाले आहे. नवनागापूर ते वडगाव गुप्ता हा रस्ता करणे गरजेचे झाली आहे. कारण वडगाव गुप्ता येथील ग्रामस्थांसाठी नवनागापूर बाजारपेठे जवळची आहे. तसेच या रस्त्याने कामगार वर्गाची मोठी वर्दळ असते.

जेऊर, पिंपळगाव माळवी, शेंडी, पोखर्डी आदी गावामधून कामगार येथील औद्यागिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमध्ये काम करीत आहे. त्यांना हा रस्ता जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)