नगरच्या बाजरपेठेत खेरदीची लगबग !

नगर : शहराच्या मुख्य कापडबाजारात दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांची झालेली गर्दी. (छाया : देविप्रसाद अय्यंगार)

नगर  – दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी रविवार आल्याने नगरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारपेठ या गर्दीने लखलखली होती. कपड्यांच्या दुकानांबरोबरच फराळाचे साहित्य, किल्ल्यावर ठेवायला खेळणी, पणती याबरोबरच घरगुती उपकरणे खरेदीसाठी नगरकरांची बाजारपेठेत दोन दिवसापासून गर्दी होऊ लागल्याने व्यापार तेजीत आला आहे.

शनिवारी सायंकाळी अवेळी पावसाने हजेरी लावल्याने आणि पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला काहीसा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठे गर्दी होऊ लागल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून नगरची बाजारपेठ सज्ज झाली होती. कपडे व्यापाऱ्यांनी दिवाळीचा ट्रेन्ड बघून त्यानुसार आधुनिक स्टाईलचे पेहराव बाजारपेठेत आणले आहेत. मात्र, शाळेला सुटी लागल्यानंतरच कपडे बाजारपेठ फुलणार, असा कयास व्यापारी व्यक्त करीत होते. त्याची प्रचिती आजच्या रविवारी आली.

“धंद्यात मंदी आहे, पैसाच नाही, दिवस खूपच वाईट आहेत, ही दुष्काळामुळं दिवाळी अवघडच जाणार आहे, हे वर्ष खूपच वाईट गेलंय, कस्टमरच नाही, भविष्यात आणखी अवघड परिस्थिती होईल, अशा नानाविध मार्गांनी नकारात्मक समोर येत असते. सततच्या नकारात्मक तक्रारीमुळे विचारही नकारात्मक होऊ लागतात. ही निराशात्मक मानसिकता कर्मचारी वर्गामध्ये निर्माण व्हायला वेळ लागत नाही. नकारात्मक ऊर्जा मित्र मंडळींसह ग्राहकांपर्यंत पोहोचत असते, याचा परिणाम व्यवसायावर होतो. मार्केट खालीवर होतंच असतं. “दोन पावले पुढे, एक पाऊल मागे’, हा मार्केटचा नियमच आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मार्केट काहीसे अस्थिर आहे. या अस्थिरतश नकारात्मता अधिकच तेजीने पसरत आहे. परंतु नकारात्मकतेवर दिव्यांचा उत्सवच म्हणजे दिवाळीच मात करते, याचाही विसर पडता कामा नये. दिवाळी उत्सवामुळे मार्केटमध्ये उत्साह दिसतो आहे. मार्केट तेजीत आहे. ग्राहकालाही ते पटवून द्या. दुष्काळसदृश परिस्थितीबरोबर आर्थिक मंदीचा तात्पुरता इफेक्‍ट आहे, परिस्थिती ही सतत बदलत असते. ही दिवाळी हाच सकारात्मकतेचा संदेश घेऊन आली आहे.
– रमेश गुगळे संचालक, एच. यु. गुगळे फर्म, जामखेड

शहरातील मुख्य कापडबाजारात आज सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागातील चितळेरोड, माळीवाडा, गाडगीळ पटांगण, सारसनगर रोड, बुरूडगाव रोडसह उपनगरातील केडगाव, सावेडी, भिंगार, बोल्हेगाव, नवनागापूर, नागापूर व एमआयडीसी परिसरातील वसहातींमधील दुकानांसह रस्त्यावर पुजाच्या साहित्याचे रस्त्याच्या दुतर्फा छोटी दुकाने थाटली होती.

विविध आकाशदिव्यांसह आकर्षक अशा पणत्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. दिवाळीच्या तिथीवर घरात आवश्‍यक असणाऱ्या उपकरणांची बुकिंगसाठीही बाजारात गर्दी होती. वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रीज, ग्रीजर, एसी, घरगुती सजावटीसाठी इंटरिअर डिझायनचे साहित्याची पूर्व नोंदणीही झाली होती. हे साहित्य घेण्यासाठीही बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे.

लहान मुलांचे दिवाळी सण म्हटले की इतिहासाला उजाळा देण्याचा दिवस असतो. त्यासाठी किल्ल्यावर आवश्‍यक असलेली खेळणीही बाजारात दाखल झाली आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीसह, जिजाऊ, संताजी-धनाजी, शिपाई, गवळणी मातीपासून तयार करण्यात आल्या मूर्तींची खरेदी होत होती. कापड बाजारपेठेबरोबरच सुवर्ण बाजारपेठ देखील ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजननंतर बलिप्रतिपदाच्या दिवशी ग्राहकांची गर्दी सुवर्णपेढीत वाढू लागते, असे सराफ सागर कायगांवर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)