गरजू, कष्टकरी, वंचित महिलांना साड्या वाटप

पद्मशाली सोशल फाऊंडेशन ट्रस्टचा दिवाळीनिमित सामाजिक उपक्रम

नगर – दिवाळी हा सण चैतन्याचा, प्रकाशाचा, मांगल्याचा आनंदाचा अन प्रसन्नतेचा म्हणून ओळखता जातो. गरीब असो अथवा श्रीमंत प्रत्येकाच्या घरी दिवाळी हा सण धुमधडाक्‍यात साजरा करण्यात येतो. देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पद्मशाली सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या संकल्पनेतुन गरजू , वंचित व कष्टकरी महिलांसाठी दिवाळी सणाचा आनंद घेता यावा म्हणून तुमच्याकडे ज्या चांगल्या साड्या आहेत, पण त्या तुम्ही वापरत नाही, त्या साड्या आमच्याकडे द्या, आम्ही गरजूपर्यंत पोहचवु या उपक्रमांतर्गत यावर्षी पद्मशाली सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमास नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. 1007 साड्या जमा झाल्या.

शर्ट, पॅट, सफारी, कुडता असे अनेक कपडे नागरीकांनी जमा केल्या. व सर्व जमा झालेल्या साड्या व इतर कपडे आज शहरातील मंदिराजवळ, बस स्टॅण्ड, माळीवाडा, रेल्वे स्टेशन, काटवन खंडोबा मंदिर, शिवाजीनगर, भावनाऋषी सोसायटी आणि काही सामाजिक संस्थामधील 754 गरजू कष्टकरी, भिक्षुक, वंचित महिलांना देण्यात आल्या. तसेच फाऊंडेशनचे मनोहर बोरा यांच्याकडून सर्व महिलांना मिठाई बॉक्‍स देण्यात आल्या. या उपक्रमाचे नगर शहरातील नागरीकांनी कौतुक केले. मागील वर्षी 390 साड्या गोळा करुन गरजूपर्यंत पोहचवल्या होत्या.

मार्कंडेय मंदिरात महाआरती करुन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित गुंडू म्हणाले कि, आम्ही पद्मशाली सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवित असतो. जेणे करुन समाजातील वंचित व गरजू घटकांना त्याचा फायदा मिळावा. त्याच उद्देशाने दिवाळीनिमित्त मागील 2 वर्षापासून हा सामजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. नगर जिल्ह्यासह यवतमाळ, नाशिक, पुणे या ठिकाणाहुन 1007 साड्या जमा करण्यात आल्या. त्यापैकी आम्ही 754 चांगल्या साड्या गरजू व वंचित महिलांना दिल्या. बाकी साड्या व कपडे नगरमधील काही सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित गुुंडुू, सचिव अजय लयचेट्टी,कार्याध्यक्ष अमोल गुंडू, श्रीकांत नुती, गणेश लयचेट्टी, प्रकाश कोटा, गणेश झिंजे, अर्चना झिंजे, विशाल द्यावनपेल्ली, श्रीनिवास बुरगुल, आकाश अरकल, संतोष गुंडू, अमित सुंकी, अक्षय बल्लाळ, संजय नुती, श्रीकांत बिल्ला, बालाजी कोक्कुल, वैभव अरकल, मयुर कल्याणम, मयुर जिंदम, अक्षय अरकल, शुभम महेसुनी आदी गेल्या 15 दिवसापासून यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)