फटाकेमुक्त ‘दीपावली’ साजरी करणार

स्वामी समर्थच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ!

पाथर्डी – शहरातील स्वामी समर्थ विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाके न वाजविण्याची शपथ घेतली, शाळा प्रशासनाच्या या उपक्रमाचे शहरात स्वागत होत आहे. दीपावली म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचे उधाण, जुने मतभेद, हेवेदावे विसरून एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण आणि त्याचबरोबर मुलांचा उत्साह, आनंद म्हणजे फटाके !

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फटाक्‍यांची आतषबाजी, धूमधडाका, रात्र झाली की हवेत उडणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्‍यांनी आसमंत उजळून निघतो. फटाक्‍यांच्या धूमधडाक्‍याने परिसर व्यापून जातो. मुलांच्या उत्साहाला उधाण येते. मात्र हेच फटाके ध्वनी आणि वायु प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत.

फटाक्‍यांच्या आवाजाने ध्वनीप्रदूषण तर होतेच, परंतु फटाक्‍यांच्या धुराने हवेच्या प्रदूषणाचा स्तरही वाढतच जातो. यामुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार वाढतात, वृद्धांना ध्वनी आणि वायूप्रदूषणाचा भयंकर त्रास होतो, लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या श्री स्वामी समर्थ बालविद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दिलीप भांडकर, मुख्याध्यापक एकनाथ ढोले, शिक्षक सोनाली सोनवणे, प्रविण गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, सुरज आव्हाड शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत झोंड, कृष्णा होनमणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)