दीपावली हिंदू-शीख बंधुभावाचे प्रतीक

अमृतसर येथे मोठ्याप्रमाणावर साजरा होतो ‘बंदी छोड दिवस’ 

शिखांचे सहावे गुरु श्री हरगोबिंद साहिबजी दिवाळीच्या दिवशी, ग्वाल्हेरच्या किल्ल्‌यातील 52 राजे कैदेतून सोडवून अमृतसर येथे पोहचले. या आनंदात, बाबा बुद्धाजीच्या नेतृत्वाखाली, शिखांनी अमृतसरमधील दीपामाला केले. आजपर्यंत अमृतसरमध्ये आणि संपूर्ण विश्‍वात शीख पंजाबी समाज हा सण ‘बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रथम 1619 मध्ये हा दिवस साजरा केला गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपावली हा हिंदू आणि शिख बंधुतेचा संयुक्त उत्सव आहे. नवरात्री आणि दीपावलीपासून पूजा सुरू होण्यापासून धार्मिक कार्य सुरू होते, या सर्व क्रियांचा त्यांच्या स्वतःचे धार्मिक महत्व असते. त्याचवेळी शिख धर्मातील दीपावलीचा दिवस ‘बंदी छोड दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव शिखांच्या तीन उत्सवांपैकी एक आहे, ज्यात प्रथम माघी, दुसरे बैसाखी आणि तिसरे बंदी छोड दिवस’ या दिवशी गुरुद्वाऱ्यात विशेष करून धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण या दिवशी असत्यावर विजय मिळविला गेला आहे.

पाचवे गुरु श्री गुरु अर्जुन देव जी यांच्या शहीदि नंतर, मिरी आणि पिरी अस्या दोन तलवारी धारण करून गुरु हरगोबिंद साहिब यांनी श्री अकाल तख्त साहिब तयार केले आणि लोकांच्या तक्रारी ऐकायला आरंभ केले. या मुळे मुगल सरकारने गुरू हरगोबिंद साहिबजी यांना बंडखोर मानून त्यांना ग्वाल्हेर किल्ल्‌यात अटक करण्यात आली होती.
खुशवंत सिंह यांच्या मते, सुरुवातीच्या काळात सिख संस्था मध्ये होणाऱ्या बदलाकडे सरकारचे लक्ष गेले नव्हते, परंतु जेव्हा गुरुजींचे शिष्य आणि येणाऱ्या लोकांची संख्या वाढली तेव्हा अधिकाऱ्यानी गुरुजींच्या विरोधात मुगल सरकारकडे तक्रार पाठविणे सुरू केले.

जहांगीर यांनी गुरुजींची अटक आणि गुरुजींच्या सैन्यात फूट पाडण्याचे आदेश दिला. ग्वाल्हेर किल्ल्‌यात गुरूजींना एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात टाकण्यात आले. या किल्ल्‌यात 52 इतर राजे कैदी म्हणून ठेवले गेले. गुरुजींना दररोज मिळणाऱ्या खर्चातून कधहा प्रसाद बनवून सर्व कैद्यांना द्यायचे आणि स्वतः, स्वत: कीर्तन करणाऱ्या शिखांच्या खऱ्या कमाईतून लन्गर करायचे आणि भक्ती मध्ये लिन राहत.

दरम्यान, जहांगीर एका विचित्र मानसिक आजारामुळे त्रस्त होते. रात्री झोपताना त्यांना भीती वाटू लागली, कधीकधी सिंह त्यांना मारण्यासाठी येत असल्याचा त्यांना भास होत असे. त्याने त्याचे रक्षक कठोर केले आणि बऱ्याच हकीमा आणि वेदांचा उपचार केला, परंतु ते या रोगापासून मुक्त होऊ शकला नाही.

शेवटी, ते साई मिया मीरांच्या आश्रयस्थानात आले. साईं जी म्हणाले की हे रब्बीच्या प्रेमाचा छळ करण्याचा परिणाम आहे. साई जी हे स्पष्टपणे सांगतात की गुरू हरगोबिंद साहिब रब्बीचे रूप आहे. आपण आधीच त्याच्या वडिलांना ठार केले आहे आणि आता त्यांना तुरुंगात टाकले आहे.

जहांगीर म्हणाले की आधी जे झाले ते झाले, पण आता मला या रोगापासून वाचवा आणि साई जी जे म्हटले त्या आधारावर, जहांगीर यांनी गुरुजींना सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुजींच्या सुटकेची बातमी ऐकल्यानंतर सर्व राजे फारच चिंतित झाले कारण त्यांना माहित होते की गुरुजी शिवाय कोणीही त्यांचे ऐकणार नाही आणि गुरू किल्ला सोडून गेले तर मग त्यांचे काय होईल? गुरु साहिब यांनी सगळ्यांना धीर दिला आणि सर्व राजांना गुरुजींनी वचन दिले की ते सर्व कैद्याना मुक्त करतील. गुरूजींनी एकटे किल्यातून निघायला नकार दिला.

राजाला ही गोष्ट कळली सम्राट सर्व राजांना सोडू इच्छित नव्हते, म्हणून त्याने सांगितले की, गुरुजींच्या कपड्यानं धरून जे राजे जाऊ शकतील, त्यांना किल्ल्‌यातून मुक्त केले जाईल. गुरुजींनी 52 कळी असलेले विशेष वस्त्र तयार केले. मग सर्व राजे गुरुजीच्या वस्त्राची एक एक कळी धरून बाहेर आले. या वेळेस गुरुजींनी राज्यांना ग्वालियर च्या किल्यातून मुक्त केले म्हणून गुरुजींना, बंदी छोड दाता म्हणून संबोधले जातात.

बाबा बुधाजींच्या नेतृत्वाखाली, समूह साद संगत यांनी अमृतसर साहिब येथे गुरुजीं आणि राजे पोचल्यानंतर दीपामाला केली. तेव्हा पासून अमृतसर मधील दीपावली उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. म्हणूनच असे म्हटले जात आहे की, डाळ रोटी घरची आणि दिवाळी अमृतसरची.

16 व्या शतकात कार्तिक अमावस्याच्या दिवशी शिखांचे चौथे गुरु, गुरु रामदासजी यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची स्थापना केली होती आणि हा उत्सव हर्ष उत्साहात सर्व शीख समाजाच्या वतीने साजरा केला जातो.
संकलक, हरजितसिंह वधवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)