विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणस्नेही दिवाळीचा निर्धार !

अकोले – तालुक्‍यातील वीरगाव शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. माती, ध्वनी, हवेचे प्रदूषण करणारे विनाशकारी फटाके न वाजवण्याचा निर्धार यावेळी मुलांनी केला.

वीरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण रक्षणाविषयी मुलांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. फटाके वाजवताना होणारे अपघात, पर्यावरणाचे कसे नुकसान होते, याची माहिती मुलांना सांगताना विनाशकारी फटाके न वाजवण्याची शपथ भाऊसाहेब चासकर यांनी दिली.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद थोरात, प्रभारी मुख्याध्यापक दिनकर दातीर, संभाजी वैद्य, राम वाकचौरे, अनिता भालेराव, भास्कर आंबरे, सबाजी दातीर, रावसाहेब सरोदे, देविदास गिऱ्हे, मीनल चासकर यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)