विद्यार्थ्यांनी घेतला आकाशकंदील बनविण्याचा आनंद

कर्जत – तालुक्‍यातील कुळधरण जवळच्या गुंड-वारे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदापासून आकाशकंदील बनवण्याचा आनंद घेतला. शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा आनंद घेऊन शाळेचा निरोप घेतला. स्मिता गडगडे व नितीन घालमे या शिक्षकांनी हा उपक्रम राबविला.

विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागले होते. दिवाळीच्या सुट्टीत आकाशकंदील लावणे, फटाके उडविणे, मेवा मिठाईचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह होता. त्यातच शाळेला सुट्टी लागण्याच्या दिवशी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेतल्याने विद्यार्थी आनंदी झाले.

विविध प्रकारचे रंगीत घोटीव कागद, कात्री, डिंक, चिकटपट्टी आदी साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशकंदील बनविले. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी कागदाचे विविध आकार तयार करून घेत आकाश कंदीलाची निर्मिती केली. तयार केलेले आकाशकंदील घरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)