श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांना कपडे, मिठाईची भेट

केअरिंग फ्रेंड’ संस्थेचा उपक्रम

नगर – शहरातील सांगळे गल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत ‘केअरिंग फ्रेंड्‌स’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे दीपावली भेट देण्यात आली. याप्रसंगी नगर सेंट्रल रोटरी क्‍लबचे अध्यक्ष गिरीश मुळे व नरेंद्र अंकुश हे प्रमुख अतिथी होते.
गिरीश मुळे म्हणाले, खूप अभ्यास करा, हसा खेळा, आनंदी राहा व दिवाळी आनंदाने साजरी करा दिवाळीत जास्त प्रदुशनाचे व मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नका, त्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेत ‘केअरिंग फ्रेंड्‌सतर्फे विद्यार्थ्यांना कपडे, सुगंधी साबन, सुगंधी तेल, उटणे, प्रदूषणविरहित फटाके व मिठाई अशी कीट दीपावली भेट म्हणून दिली. ही दीपावली भेट पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जिल्ह्यातील आदिवासी भटक्‍या जाती जमातीतील बालकांच्या जीवन बदलाकरिता संस्था कार्य करीत आहे.

पारधी, वैदू ,घिसाडी, धनगर, डोंबारी, लमान, आणि अशा अनेक आदिवासी भटक्‍या जमाती यांना शाश्‍वत उपजीविकेचे साधन नसल्यामुळे ही संस्था याच उपेक्षित परिवारातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

कार्यक्रमप्रसंगी श्री समर्थ विद्या मंदिर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शं.भा. व्यापारी, उपाध्यक्ष भा.ल. जोशी, सेक्रेटरी प्र.स. ओहळ, चेअरमन ह.वा इनामदार, शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, विश्वेश भालेराव, डी. आर. कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, ऍड. किशोर देशपांडे, युवराज गुंड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)