जयहिंदच्या महिलांकडून सैनिकांना फराळ 

संगमनेर – देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना सणासुदीच्या दिवसातही घरी येता येत नाही. अशा जवानांना दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी संगमनेर येथील जयहिंद महिला मंचने सैनिकांसाठी दिवाळीचा फराळ भेट म्हणून पाठवला. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानाहून संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली येथे महिलांनी घरगुती बनविलेले फराळ रवाना करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भारतीय सैनिक हे देशाच्या रक्षणासाठी आपल्या परिवारापासून हजारो मैल दूर असतात. सणासुदीच्या काळातही त्यांना जागता पहारा द्यावा लागतो. दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी सीमेवर रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊसात आपले कर्तव्य पार पाडत असतात. देशातील नागरिक जवानांच्या सदैव पाठीशी आहेत. ही आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शरयुताई देशमुख यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्‍यातील बचत गट महिला मंडळानी लाडू, शंकरपाळे, शेव, चिवडा व विविध फराळाचे पदार्थ बनवले. यावेळी शरयुताई देशमुख, अर्चनाताई बालोडे, निर्मलाताई गुंजाळ, शारदा वाणी, नंदाताई तांबे, सुनिता कांदळकर, धनश्री तांबे, विद्या गुंजाळ, शालन गुंजाळ, सुनंदा जोर्वेकर, नैना रहाणे, पुनम मुंदडा, मंगल कासार, निवृत्त सैनिक हवालदार रावसाहेब कोटकर, प्रकाश कोटकर, मंजुषा नवले, मनिषा भळगट, शिवांजली गाडे, मनिषा शिंदे, सुवर्णा खताळ आदी महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)