विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दीपावलीची शपथ

सविता रमेश फिरोदिया प्रशालेत उपक्रम

नगर : जल-वायू-अग्नी हे मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. यावरच आपले जीवनमान अवलंबून आहे. परंतु गेल्या काही वर्षात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहेत. यासाठी प्रत्येकजण थोड्याप्रमाणात का होईना जबाबदार आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या चुकांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचाच परिणाम मानवी जीवन आणि प्राण्यांवरही होत आहे. आता हे थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी शपथ घेऊन यापुढील काळात आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या वस्तू न वापरणे, परिसराची स्वच्छता ठेवणे, फटाके न वाजविणे यासारख्या गोष्टी जर टाळल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण थांबवू शकतो, असे प्रतिपादन सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापक योगिता गांधी यांनी केले.

प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता, प्लॅस्टिक बंदी व फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेतली. याप्रसंगी मुख्याध्यापक योगिता गांधी व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे गांधी म्हणाल्या, विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच चांगले संदेश दिले गेले पाहिजे, आम्ही त्यांच्यात पर्यावरणाविषयी जागृती करत आहोत.

तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेतर्फे दिवाळी बाजारचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, आकर्षक डिझाईनच्या पणत्या, शोभेच्या वस्तू बनविल्या होत्या. त्या वस्तूंची विक्री करुन मुलांना व्यावहारीक ज्ञानही देण्यात आले. त्यास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांही उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत असतात. आज विद्यार्थ्यांनी दिलेल्या फटाकेमुक्त दिवाळीची शपथ आचरणात आणतील, अशी आशा गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. श्रीराम खाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, निलेश आंबेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)