रांगोळीतून विद्यार्थिनींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

पी.ए. इनामदार शाळेचा उपक्रम शिक्षकांच्यावतीने विद्यार्थ्यांना फराळ वाटप

नगर – सर्व समाजबांधवांसाठी खास आकर्षण असलेला दिवाळी सण मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. शाळेत मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर शिक्षकांनी बनविलेले फराळचे पदार्थ विद्यार्थ्यांना वाटप करुन दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

शाळेत शिकत असलेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभागी होत, आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थ्यांनी आकर्षक शुभेच्छा पत्र बनविले होते. या उपक्रमाद्वारे फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करीत, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव देऊन दिवाळी साजरी करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य हारुन खान व उपप्राचार्य फरहाना शेख यांनी सांगितले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक राजश्री भिंगारदिवे, सरोज नायर, मुशिर साने, संतोष जाधव, राजिक खान, प्रकाश पठारे, जालिंदर काळे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)