साकुरी ते आळंदी पायीदिंडी सोहळ्याचे प्रस्थान

राहाता- साकुरी ते तिर्थक्षेत्र आळंदी पायीदिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान उपासनी महाराजांचे दर्शनाने रविवार (दि. 25) रोजी झाले. या दिंडीत सव्वाशे वारकरी भाविक सहभागी झाले असून दररोज 20 किलोमीटर पायी अंतर कापत 11 व्या दिवशी ही दिंडी श्रीक्षेत्र आळंदी येथे पोहोचणार असल्याची माहिती संयोजकांचे वतीने पोपटराव गुंजाळ यांनी दिली.

गुंजाळ म्हणाले, विरभद्र साई उपासनी महाराज वारकरी संस्थेच्या वतीने दरवर्षीच हा पायीदिडीं सोहळा तिर्थक्षेत्र आळंदी येथे जात असतो. दिंडीचे हे सहावे वर्ष असून अर्जून महाराज चौधरी, दिनकरराव बावके, पोपटराव गुंजाळ आदिंच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी जात असते.

-Ads-

श्रध्दा व सबुरीचा व वारकरी एकतेचा संदेश देत स्वच्छतेचे प्रतिक घेऊन ही पालखी आळंदीला जात असते. दररोज मुक्कामाची व जेवणाची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणच्या भाविकांच्या वतीने केली जाते. 5 डिसेंबर 2018 रोजी काल्याचे कीर्तनाने व महाप्रसादाने दिडींची सांगता होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)