सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

अकोले – धुमाळवाडीच्या सरपंच चंद्रकला धुमाळ यांच्या विरुद्ध आणलेला अविश्वास ठराव 9 विरुद्ध 1, अशा फरकाने मंजूर झाला. आज (दि.26) सकाळी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रा. पं. सदस्यांच्या सभेत हा अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. मात्र ठराव मंजूर होण्यापूर्वीच राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याचे सरपंच धुमाळ यांनी सांगितले.

सरपंच धुमाळ यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य स्वाती प्रकाश धुमाळ, रंजना संपत धुमाळ, संगीता किसन चौधरी, लतिका आबासाहेब नाईकवाडी, रवींद्र जयवंत गोर्डे, शांताराम गोविंद धुमाळ, किरण लोहरे, बाबाजी झोळेकर, शिवाजी रामनाथ धुमाळ यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपसरपंच डॉ. रवींद्र गोर्डे यांनी ठराव तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे दाखल केला होता. सरपंच धुमाळ मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ठराव मंजूर करतात, मिळकतीच्या नोंदींमध्ये हस्तक्षेप करून ग्रामपंचायतीचे नुकसान करतात, गावातील अवैध धंद्यांना पाठबळ देतात, असे आरोप करण्यात आले आहेत.

तहसीलदार कांबळे यांनी सर्व सदस्यांची बैठक घेतली. यावेळी सरपंच धुमाळ म्हणाल्या, अविश्वास आणणाऱ्यांनी माझ्यावर ज्या कारणांनी आरोप केले, त्यात काहीच तथ्य नाही. मी अविश्वास ठराव दाखल करण्याच्या आगोदरच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला आहे. माझ्यावर जे आरोप केले, ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे प्रतिआव्हान धुमाळ यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)