राहुरीत शुक्रवारी ‘धनगर’ आरक्षण एल्गार मेळावा

नान्नोर : आरक्षण देऊन राज्यात मूल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे आवाहन


शुक्रवारी दुपारी 12 वाजता मेळाव्याचे आयोजन

राहुरी – तालुक्‍यातील सकल धनगर समाजातर्फे राहुरी येथे शुक्रवारी ( दि. 30) दुपारी बारा वाजता नवी पेठ, सरकारी दवाखान्यासमोर धनगर आरक्षण एल्गार मेळावा आयोजित केल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशालीताई नान्नोर यांनी दिली.

नान्नोर म्हणाल्या, मेळाव्यास धनगर आरक्षणाचे अभ्यासक गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर हे प्रमुख मार्गदर्शक असून शिवदास बिडगर हे दौरा प्रमुख आहेत. धनगर समाजाला आघाडी सरकारने फसवलं म्हणून भाजपा सरकारला स्वीकारलं. त्यांनीही आरक्षणाचा घात केला. 2019 च्या निवडणुका घोषित होण्यापूर्वी सरकारने आरक्षणाचे सर्टिफिकेट हाती द्यावे. अन्यथा विद्यमान सरकारच्या अंगावर कधीही गुलाल पडणार नाही, असा संकल्प राज्यातील धनगर समाजाने केला आहे.

व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची क्षमता धनगर समाजात आहे. होळकर परंपरेनुसार सर्व वंचित समाजाला बरोबर घेऊन राज्यात मूल्यात्मक परिवर्तन घडविण्यासाठी धनगर समाज सरसावला आहे. 62 वर्षांच्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी ही लढाई आरपारची असल्याचे नान्नोर म्हणाल्या.

मेळाव्यास धनगर व वंचित समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैशालीताई नान्नोर ,संचालक ( पाटबंधारे विभाग), नारायण तमनर, राहुरी साखर कारखान्याचे संचालक अर्जुन बाचकर, मार्केट कमिटीचे संचालक अण्णासाहेब बाचकर, ऍड. कचरू चितळकर, कारखान्याचे माजी व्हा. चेरमन विठ्ठल बिडगर, रावसाहेब तमनर, सरपंच सखाराम सरक, अण्णासाहेब खिलारी, अविनाश बाचकर, प्रा. गणेश चितळकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महानोर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)