कार्तिक पौर्णिमेनिमित्त देवगड येथे तीन लाख भाविक

नेवासाफाटा – नेवासा तालुक्‍यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला दुपारी 12 वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामी जयघोषात महाआरती पार पडली. कार्तिक स्वामींच्या उपासनेने साहस, धाडस, शक्ती, युक्ती व बुद्धीची प्राप्ती होते असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलताना केले.

यावर्षी सलग दोन पौर्णिमा गुरुवारी दि.22 व शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी आल्यामुळे दोन दिवसात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी (दि.23) भाविकांनी दर्शनासाठी गर्दीचा उच्चांक केला होता. यात महिला भाविकांची गर्दी लक्षणीय होती. पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला, यावेळी झालेल्या अभिषेक व धार्मीक कार्यक्रमाचे पौराहित्य गंगापूर येथील सोनू गुरू देवळे, ग्रामपुरोहित कांता गुरू जोशी व स्वानंद जोशी यांनी केले.

यावेळी झालेल्या महाआरती प्रसंगी देवगडचे संत सेवेकरी बदामराव पठाडे, बंटी महाराज पठाडे, सरपंच अजय साबळे, भिमाशंकर वरखडे, बाळू महाराज कानडे, सीताराम जाधव, अंबादास फोलाने, काशिनाथ आण्णा नवले, गोविंदराव शेळके, तात्या महाराज शिंदे, बाबासाहेब आहेर, मनोज पवार, बाबासाहेब खोबरे, विवेक महाराज साबे, चांगदेव आण्णा साबळे, महेंद्र फलटणे, दिगंबर तळेकर यांच्यासह संत सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सलग दोन दिवस आलेल्या त्रिपुरारी व कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी त्रिपुरारी वाती जाळून विधीवत पूजन केले. तसेच गंगास्नान करून प्रवरामाईला दिवे अर्पण केले. सर्वांना कार्तिक स्वामींना अभिषेक घालता यावा म्हणून मंदिर प्रांगणात मंडपाची उभारणी करून चांदीच्या मूर्तीस अभिषेक घालण्याची व्यवस्था करण्यात आली होती

कार्तिक पौर्णिमेला देवगड प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. भगवान दत्तात्रय व कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बारी लागली होती. महाआरतीला गर्दीने उच्चांक केला होता. गंगापूर तालुक्‍यातील कनकोरी, गळनिंब, जामगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामी, पंचमुखी सिद्धेश्वर, श्री समर्थ किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्तिक पौर्णिमेला देवगडला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)