File Photo

नगर – दिल्ली दरवाजा येथील मोहबाग परिसरात सुरू असलेल्या जुगारावर छापा घालत पोलिसांनी 12 जुगारींना गजाआड केले. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 1 लाख 19 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आदित्य टाक (रा. पोलीस मुख्यालय मागे), ज्ञानेश्‍वर दौंडकर (तोफखाना), राजेश चव्हाण (रा. टीएटी कॉलनी), नंदू दातरंगे (रा. दातरंगे मळा), राजेश चंदानी (रा. बोरुडे मळा), गणेश रजपूत (रा. गवळीवाडा), राजू टेके (रा. मल्हार चौक), विनोद जोग (रा. शेरकर गल्ली, सर्जेपुरा), श्रीकांत तारू (रा. टांगेगल्ली), राजू खार्डे (रा. भाजी मार्केट), शंकर जमाल (रा. शिवाजीनगर), कुमार छाबडिया (रा. ताराबाग कॉलनी) या 12 जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)