श्रीगोंद्यात दहीहंडी धुमधडाका

श्रीगोंदा – कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो. तीन महिन्यावर नगरपरिषदेची निवडणूक येऊन ठेपल्याने चालू वर्षी शहरात गोकुळाष्टमीची धूम सुरू आहे. सिने अभिनेते, अभिनेत्री, ऑर्केस्ट्रा, लेझर शो आदी कार्यक्रम घेत नेत्यांनी आपली सर्वशक्तीपणाला लावत नगरपरिषद निवडणूकीचे दंडच थोपटले आहे.

माजी नगराध्यक्षा छाया गोरे व बापूसाहेब गोरे मित्र मंडळाने बाजार तळात 4 सप्टेंबरला मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सिने अभिनेत्री तेजा देवकर प्रमुख उपस्थिती आहेत. त्याच बरोबर नामांकित ऑर्केस्ट्राचे देखील आयोजन केले आहे. दहीहंडी फोडणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर आमदार राहुल जगताप यांच्या मित्र परिवाराने जोधपूर मारुती चौकात 4 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाची व्ह्यूरचना आखली आहे. अभिनेते मिलिंद दासताने व अभिनेत्री रुचिरा जाधव कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे.

3 सप्टेंबरला शहरात मनाची दहीहंडी असलेल्या शनिमारुती मित्र मंडळाच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. मनाची दहीहंडी असल्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोटे यांनी सर्वशक्तीपणाला लावली आहे. तर जय भैरवनाथ मित्र मंडळाच्या दहीहंडीत स्थानिक नगरसेवक व स्थानिक कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे. या मंडळाने आकर्षित लेझर शोचे आयोजन केले असून दहीहंडी फोडणाऱ्यास 51 हजाराचे बक्षीस ठेवले आहे.

शहरात साजऱ्या होणाऱ्या सर्वच दहीहंडी ना नाही म्हटले तरी नगरपरिषद निवडणुकीची किनार आहे. त्यामुळे आपले शक्तिप्रदर्शन करत निवडणुकांचे रणशिंग च या उत्सवात फुकले जाणार यात शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)