नगर व भिंगारमध्ये २४ मंडळांची दहिहंडी

सार्वजनिक मंडळांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्सव साजरा

नगर – शहरासह ग्रामीण भागात दहिहंडी उत्सव उत्साहात झाला. नगर शहरासह उपनगरातील सुमारे 24 मंडळांनी उत्सवात सहभाग घेतला होता. त्यातील महापालिकेकडून रात्री उशिरापर्यंत सात मंडळांनी उत्सव परवानगी घेतली होती. दरम्यान, शाळा, नर्सरी, महाविद्यालयांमध्ये देखील हा उत्सव साजरा झाला. नगर-सोलापूर रस्त्यावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयोजित दहिहंडी उत्सवात विद्यार्थी जखमी झाला. शहरातील सार्वजनिक मंडळांमध्ये हा उत्सव रात्री दहावाजेपर्यंत रंगला होता.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानच्या दहिहंडीच्या उत्सव रंगला होता. सिनेअभिनेत्रीच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये जल्लोष होता. इंपिरिअल चौकात हे मंडळ असल्याने तेथील वाहतुकीचे नियोजन पोलिसांनी केले होते. केडगाव, बुरूडगाव, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दहिहंडी उत्सवावर पोलिसांची नजर होती. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक उत्साह होता. चितळेरोडवर दरवर्षीप्रमाणे यावेळीही दहिहंडीचा उत्सव होता. याच रोडवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने नेता सुभाष तरुण मित्र मंडळाच्या मंडपावर कारवाई केली होती. त्यामुळे पोलिसांनी येथे अतिरीक्त पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

भिंगार शहरातील तीन मंडळांनी उत्सवासाठी परवानगी घेतली होती. कॅंटोन्मेंट बोर्ड सदस्य रवींद्र लालबोंद्रे, गवळीवाडा येथील नामदेव लंगोटे आणि फकिरवाडा येथील रवी मोरे यांच्या मंडळांचा समावेश होता. दरम्यान, नर्सरी, अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील हा उत्सव साजरा करण्यात आला. अंगणवाडी आणि नर्सरीमधील बालगोपालांना श्रीकृष्णचा पेहराव करण्यात आले होते.

इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थी जखमी

नगर-सोलापूर रस्त्यावरील एका नामांकित शाळेत दहिहंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण नसताना देखील दहिहंडी फोडण्यासाठी थर उभारण्यात आले होते. थर कोसळून विद्यार्थी यात जखमी झाला. सुशांत कार्ले (रा. समर्थनगर) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडून देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)