‘सायबर सेल’चा समाज माध्यमांवर वॉच

जिल्हा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागामार्फत समाजातील विविध वयोगटातील ग्रुपवर लक्ष

प्रदीप पेंढारे

आर्थिक फसवणुकीत तत्काळ तक्रार महत्त्वाची

मोबाईलच्या जमाण्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. प्रतिदिन नगर जिल्ह्यात सात ते आठ जणांची ऑनलाईनपद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या तत्काळ तक्रारारी तत्काळ झाल्यास फसवणूक झालेल्याचे आर्थिक नुकसान टाळता येते. वर्षभरात 21 तक्रारी सोडविल्या आहेत. फसवणूक झालेल्यांना 22 लाख रुपये परत मिळवून देता आले आहे.

फेसबुकावर बदनामी जवळच्यांकडून

फेसबुकवर बदनामीच्या तक्रारी गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात येतात. या तक्रारींचा अभ्यास केल्यावर त्या ओळखींच्या व्यक्तींकडून झाल्याचे दिसते. ओळखीच्या युवक-युवतींमधील या तक्रारी असतात. विश्‍वास संपादन झाल्याने युवक-युवती एकमेंकाचे फेसबुक खाते वापरतात. पुढे बिनसल्यावर या फेसबुकचा गैरवापर होतो. त्यातून समाजात बदनामी केली जाते. हे टाळणे आपल्याच हातात आहे.

नगर – मोहरम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलने समाज माध्यमांवर वॉच ठेवण्यास सुरूवात केली आहे. सायबर सेलच्या टिमची त्यासाठी कार्यपद्धती सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी देखील तशा सूचना दिल्या आहेत. उत्सवाला गालबोट लागले, अशी समाज माध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया टाकल्यास त्या ग्रुपचा प्रमुख आणि प्रतिक्रिया टाकणाऱ्याविरोधात तत्काळ कारवाई होणार आहे. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाचा सायबर सेल काही दिवसापासून समाज माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सेल अधिकच अलर्ट झाला आहे. सेलच्या कर्मचाऱ्यांबरोबरच जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना सावध केले आहे. समाज माध्यमांवर सर्तक राहण्यास सांगितले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना समाज माध्यमांवर ग्रुप सुरू करण्याच्या सूचना आहे. त्यानुसार डॉक्‍टर, वकील, ज्येष्ठ नागरिक, पोलीस मित्र, तलाठी, ग्रामसेवक, शांतता समिती सदस्य, जागरूक महिला, वकिल महिला, महाविद्यालयातील युवक-युवती, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, शिक्षक आदी घटकांचे वेगवेगळे ग्रुप करण्यात आले आहेत. या पद्धतीमुळे एकाचवेळी समाज माध्यमावरील हजारो जणांच्या प्रतिक्रियेवर लक्ष राहते आणि ते फायद्याचे ठरत आहे.

सायबर सेलच्या या कार्यपद्धतीमुळे मोहरम आणि गणेशोत्सवात समाज माध्यमांतून कोणत्याही घटकाच्या धार्मिक भावना दुखविणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. अशा प्रतिक्रिया व्हायरल होणार नाहीत, याची जबाबदारी ग्रुप प्रमुखांवर असणार आहे. ग्रुप प्रमुखांनी अशा तेढ निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया तत्काळ डिलिट करून, त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्याबरोबरच सायबर सेलला देखील कळवायची आहे.

उत्सवाच्या काळात समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांवर लक्ष ठेवले जात आहे. सायबर सेलला यासाठी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाची मदत घेतली जात आहे. फेसबुक, आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी सोडविण्यात सायबर सेल पुढे आहे. तांत्रिक पुरावे भक्कम असल्याने यात शिक्षेचा प्रमाण 99 टक्के आहे.
– बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)