मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

सावेडीतील घटना : पसार झालेल्या दोघांचा शोध सुरू

नगर – मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर सावेडीत बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. शामलाल चौधरी आणि महेंद्र (पूर्ण नाव समजलेले नाही) असे आरोपींचे नावे आहेत. घटनेनंतर हे दोघे पसार झाले असून, तोफखाना पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
पीडित विवाहिता ही सासू-सासरे आणि मुली समवेत सावेडीत राहते.

बुधवारी मध्यरात्रीनंतर पीडित विवाहिता ही बेडरूममध्ये एकटीच झोपली होती. त्यावेळी घराचा मागचा दरवाजात आवाज आल्याने तिला जाग आली. पीडिताने आवाजाच्या दिशेने जात कोण आहे, असे विचारल्यावर बाहेरून व्यक्तीचा आवाज आला. संबंधित व्यक्तीने महावीर, असे नाव सांगून पीडिताकडे मदत मागितली. पीडिताने त्यामुळे दरवाजा उघडला. त्यावेळी दरवाजात त्यांच्याच घराशेजारी राहणारा शामलाल चौधरी आणि त्याचा मित्र महेंद्र उभा असल्याचे पीडिताच्या लक्षात आले.

दरवाजा उघडात शामलाल याने पीडिताचे तोंड दाबले आणि महेंद्रला बाहेरून दरवाजा लावण्यास सांगितले. शामलाल चौधरी याने पीडिताला आराडाओरडा केल्यास मुलीला जीवे मारील, अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडित विवाहिता घाबरली. शामलाल चौधरी त्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडिताने सकाळी नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर आज तोफखाना पोलिसांसमोर येऊन पीडिताने तक्रार दिली. पोलिसांनी पीडिताच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे आणि उपनिरीक्षक विशाल सणस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)