नगर – रंगार गल्ली येथे जुन्या वादातून तरुणास चाकुचा धाक दाखवून दहा ते 20 जणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. योगेश दत्तात्रय ज्ञानपिल्ले (रा. देशमुखगल्ली) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

ओंकार घोलप, शुभम कमाकूल, सनी फाटक, रोहित सोनेकर, शुभम घोलप, योगेश आंधे (सर्व रा. माळीवाडा) व इतर 15 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्ञानपेल्ली हे मंडप बांधण्याचे काम करतात.

सोमवारी रात्री अकरा वाजता ते घरी जात असताना त्यांना या टोळक्‍याने अडवित शिवीगाळ केली. यानंतर चाकूचा धाक दाखवित त्यांना मारहाण केली. ज्ञानपेल्ली या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)