घरात घुसून महिलेचा विनयभंग

राहाता – झोपलेल्या विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री केलवड गावात घडला. महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी तिचा शेजारी गोरक्षनाथ सारंगधर वाघे (रा.केलवड) याच्याविरुध्द विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की केलवड (ता.राहाता) येथील विवाहिता व तिचे दोन मुले असे तिघे राहत आहे. या महिलेचा पती गेल्या तीन ते चार वर्षांपासून डोक्‍यावर परिणाम झाल्याने निघून गेला आहे. या संधीचा फायदा घेवुन वाघे (रा.केलवड) याने बुधवार मध्यरात्री या महिलेच्या घराच्या दरवाजावर थाप मारली. दरवाजा उघडल्यानंतर वाघे याने महिलेचा हात धरून विनयभंग केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपीने धरलेला हात सोडण्यासाठी या महिलेने आरडा ओरड केली असता महिलेचा मुलगा व मुलगी जागे झाले. त्यांनी आरडा ओरड करत शेजारी राहणाऱ्या आत्याला बोलावून आणले. त्यावेळी वाघे याने धमकी दिली.राहाता पोलीसांनी वाघे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)