नगर तालुका पोलिसांची कारवाई

नगर – दरोडा आणि लुटमारीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील सहा जणांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा झाल्यापासून हे आरोपी पसार होते. अटक केलेल्या या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे.
अरुण ज्ञानदेव चव्हाण (वय 35, रा. बुरूडगाव, ता. नगर), बशीकर विलास काळे (वय 35, रा. भोसले आखाडा), प्रशांत सयाजी भोसले (वय 19, रा. शेवगाव) या तिघांनी बुरूडगाव शिवारात 11 ऑगस्टला 2017 रोजी 15 लाख रुपये लुटले होते. सतीश रघुनाथ रामाणे (रा. नवीमुंबई) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती.

या गुन्ह्यातील हे तिघे आरोपी वर्षभरापासून पसार होते. पोलिसांनी त्यांना आज शिताफीने अटक केली. जालिंदर लक्ष्मण चव्हाण (वय 47), नागेश निंदुड्या चव्हाण (वय 21, दोघे रा. बुरूडगाव) या दोघांना सांडवा शिवारातील दरोड्यात अटक करण्यात आली आहे. 17 ऑगस्टला रात्री साडेबारा वाजता दरोडा टाकला होता. कुऱ्हाड आणि गजाचा दरोडेखोरांनी वापर केला होता. यात 80 हजार रुपयांची लुट झाली होती. जालिंदर व नागेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

औरंगाबाद रोडवरील पांढरीपुलावर लुटमार करण्याच्या टोळीतील नवनाथ बाळासाहेब चव्हाण (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) या नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सोनई पोलीस ठाण्यात याच्याविरोधात 18 ऑगस्टला गुन्हा दाखल आहे. येथे लुटमार करताना चव्हाण याने ललनकुमार पासवान याच्याकडून 36 हजार 500 रुपयांची लूट केली होती. नवनाथ याला अटक करून नगर तालुका पोलिसांनी सोनई पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)