शिर्डी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारास अटक

शिर्डी – घरफोड्या करून सोने, मोबाईल, तसेच रोकड लंपास करणाऱ्या रहीम ऊर्फ शंकर रवींद्र चौधरी या सराईत गुन्हेगारास शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले केले. त्याच्याकडून चोरीस गेलेला सोने व मोबाईल, असा 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले.

शिर्डी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहीम ऊर्फ शंकर रवींद्र चौधरी (वय 22, रा. बाजार तळ, शिर्डी) या सराईत गुन्हेगाराने शिर्डी परिसरातील घरांमधून सोने, मोबाईल व रोख रक्कम चोरून पोबारा होता. दरम्यान, शिर्डी पोलीस ठाण्याचे पो. ना. अजय अंधारे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तो शिर्डीत येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे, पो. हे. कॉ. प्रसाद साळवे, बी. एफ. माघाडे, पो. ना. बाबासाहेब सातपुते, पो. ना. सचिन बैसाने, पो. ना. अजय अंधारे, नितीन सानप यांच्या पथकास आदेश दिले. त्यानुसार आरोपीस सापळा लावून मोठ्या शिताफीने जेरबंद केले केले.

-Ads-

त्याच्यावर शिर्डी पोलिसात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल असून, त्याच्या जवळील सोने, मोबाईल असा एकूण 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती पो. नि. अरविंद माने यांनी दिली. पुढील तपास पो. हे. कॉ.बी. एफ. माघाडे व पो. ना. सचिन बैसाणे करीत आहे. -in-nagar-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)