विनयभंग प्रकरणी महिलेची फिर्याद

संगमनेर  – मोलमजुरी करून दोन लेकरं आणि पतीसह एकत्र कुटुंबात राहणाऱ्या एका 23 वर्षीय महिलेचा तिच्याच मोठ्या दिराने विनयभंग केल्याची घटना तालुक्‍यातील शिंदोडी गावात घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, यातील आरोपी हा पीडित महिलेचा मोठा दीर आहे. पीडित महिला एकत्रित कुटुंबात राहात असून, कुटुंबात तिचा पती, दोन मुले, सासू-सासरे, मोठा दीर, जाव अशा व्यक्ती राहतात. दिराची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी गेली होती. तेव्हापासून तो आपल्याकडे वाईट नजरेने पाहात असल्याची तक्रार तिने सासू-सासऱ्यांकडे केली; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

-Ads-

मात्र शुक्रवारी (दि. 30) रात्री नऊच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलाबरोबर झोपली असता आरोपी दीर तिच्या जवळ आला व शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. महिलेने विरोध केल्याने त्याने तिलाच काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

घडलेला प्रकार महिलेने पतीसह सासू-सासऱ्यांना सांगितला. त्यांनी याही वेळी त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे पीडित महिलेने माहेरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला आणि स्वतः घारगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन आरोपी दिरा विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात दिराविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ ए. आर. गांधले करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)