बुरखाधारी महिलांसह तिघांनी चोरल्या सव्वालाखांच्या बांगड्या

नगर  – सर्जेपुरा येथील नामांकित पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स दालनातून दोन काळा कपड्याच्या बुखाधारी महिला आणि दाढीवाल्या चोरांनी 1 लाख 20 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. सशांक बरदे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

ज्वेलर्समध्ये दागिने पाहण्याच्या उद्देशाने या दोन बुरखाधारी महिला आणि त्यांच्याबरोबर व्यक्ती होती. या तिघांना दालनात बराच वेळ घुटमळले. दागिने पाहिले. पसंत करून ते नापसंत करत होते. यानंतर हे तिघे निघून गेले. या व्यक्तींना दाखविण्यासाठी काढलेल्या दागिन्यांमध्ये दोन सोन्याच्या बांगड्या नव्हत्या.

-Ads-

त्यावरून या बांगड्या चोरीला गेल्याचा संशय आला. खात्री करण्यासाठी दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण देखील तपासण्यात आले. त्यात या तिघांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यावरून तोफखाना पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)