नगर शहरासह तालुक्‍याच्या परिसरात चोरांच्या चोरीचा आलेख वाढताच!

दोन लाखांच्या जबरी चोरीसह बीएसएनएल कार्यालय आणि कंपनीच्या साहित्यांची चोरी

एमआयडीसीतील कंपनीतून 40 हजारांच्या प्लास्टिकची चोरी

नगर – एमआयडीसीत असलेल्या कंपन्या चोरांनी चांगल्यापद्धतीन टार्गेट केल्या आहेत. चोरांनी विवेक पॉली प्रोडक्‍ट या कंपनीचे 40 हजार रुपयांचे प्लास्टिक चोरून नेले आहे. अनिल लोया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. या प्लास्टिकची किंमत काळ्याबाजारात अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

नगर – शहरासह नगर तालुक्‍याच्या परिसरात चोरांच्या प्रमाण वाढले आहे. चोरांच्या कामगिरीचा आलेख वाढत असतानाच पोलिसांकडून चोरांच्या तपासाच्या कामगिरीचा आलेख खालवला आहे. शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी निवडणुकीच्या कामानिमित्त गुंतले आहेत.

-Ads-

हद्दपारीच्या आदेश बजावण्यापासून ते निवडणुकीच्या बंदोबस्तापर्यंत पोलिसांचा सहभाग आहे. त्याचाच फायदा घेत चोरांनी शहरात जबरी चोरी, घरफोडी, दुचाकींच्या चोरी, लुटीचे प्रकार चालविले आहेत. असे असले तरी चोरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन ठेपते आहे. सर्वसामान्यांची एक चोरी दोन वर्षांच्या वार्षिक उत्पन्नाएवढी असते. त्यामुळे शहरात होणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

दोन लाखंची रक्कम असलेली पिशवीवर बाराबाभळीत डल्ला

भिंगार – बाराबाभळी (ता. नगर) येथून चोरांनी दोन लाख रुपयांची रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळवून नेली. निवृत्त भगवान देवीसिंग राठोड (रा. मेहशनगर) यांच्याबरोबर हा प्रकार त्यांच्याच घरासमोर झाला. चोरांनी ही चोरी पाळत ठेवून केल्याचे समोर येत आहे. राठोड यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत दोन लाखांची रक्कम एका प्लास्टिकची पिशवी ठेवली होती. ती पिवशी त्यांनी बाहेर काढले. तेवढ्यात एक चोर कंपाऊंडमध्ये आला. राठोड यांना काही सुचण्याच्या आत त्याने राठोड यांच्या हतातील पिवशी हिसकावून घेत कंपाऊंडच्या बाहेर पळ काढला. कंपाऊंडच्या बाहेर येताच त्या चोराचा साथीदार दुचाकी घेऊन आला आणि या दोघा चोरांनी तेथून पळ काढला. राठोड आणि त्यांचे घरातील नातेवाइक चोरांच्या मागे धावले, परंतु चोरांना पकडण्यात यश आले नाही.

मेहेकरीच्या बीएसएनएल कार्यालयातून 45 हजारांच्या साहित्याची चोरी

नगर – मेहेकरी (ता. नगर) येथील बीएसएनएलच्या कार्यालयातून चोरांनी 45 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली. कनिष्ठ अभियंता कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून नगर तालुक पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. चोरांनी कार्यालयातून 45 हजारांचे सेल चोरून नेले आहेत. पोलीस कर्मचारी बापूसाहेब फोलणे चोरीचा तपास करत आहेत.

नगरच्या अमरधामसह बोल्हेगावतून दुचाकींची चोरी

नगर : चोरांनी शहरातून दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. नगरच्या अमरधाम आणि बोल्हेगाव येथून चोरांनी दुचाकी चोरल्या आहेत. दत्तात्रय साठे यांच्या दुचाकीची चोरी अमरधामच्या प्रवेशद्वाराजवळून झाली. संदीप जाधव यांच्या दुचाकीची चोरी बोल्हेगाव फाटा येथील एका दुकानासमोरून झाली. कोतवाली व एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)