कुख्यात गुंड ‘अंतोन गायकवाड’च्या तडीपारीवर शिक्कामोर्तब

नगर – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड अंतोन शामसुंदर गायकवाड (रा. नागापूर) याच्या दोन वर्षाच्या तडीपारीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे. अंतोन गायकवाड हा नगर जिल्ह्यातून 21 मार्च 2019 पर्यंत हद्दपार राहील.

अंतोन गायकवाड याच्यावर शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांसह सामान्य माणसांकडून खडंणी मागणे, मारहाण करणे, अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे अशा प्रकाराचे सुमारे 14 गुन्हे दाखल आहेत. अंतोन गायकवाड याच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी 30 सप्टेंबर 20126 मध्ये तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.

तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी वामन कदम यांनी 22 मार्च 2017 रोजी प्रस्ताव मंजूर करत अंतोन गायकवाड याला नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीचा आदेश काढला होता. नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडील अपिलामध्ये अंतोन गायकवाड याच्यावरील तडीपारीचा आदेश कायम राहिला.

अंतोन गायकवाड याने त्यावर औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले. न्यायालयाने हे रिट पिटीशन फेटाळून लावत स्थानिक पोलीस ठाणे व उपविभागीय दंडाधिकारी यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्णय दिला. यानुसार अंतोन गायकवाड याला आता 21 मार्च 2019 पर्यंत नगर जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)