दुचाकीच्या डिकीत सुरी आणि कोयता

नीलक्रांती चौकातील प्रकार : दोघांविरोधात गुन्हा दाखल

नगर – नीलक्रांत चौकात वाहनांची तपासणी करत असताना युवकांकडे असलेल्या दुचाकीची तपासणी करताना तोफखाना पोलिसांनी डिकीतून कोयता आणि सुरी सापडले. कपिल प्रकाश साळवे (वय 27) व समेध किशोर साळवे ऊर्फ दिंग्या (दोघे रा. नीलक्रांती चौक) या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी आदिनाथ वामन यांनी फिर्याद दिली आहे. कपिल साळवे याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.12) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-

पोलीस कर्मचारी आदिनाथ वामन हे नीलक्रांती चौकात वाहनांची तपासणी करत होते. कपिल व समेध हे दोघे युवक दुचाकीवरून तिथे आले. वामन यांनी त्यांना थांबवून वाहनाची चौकशी केली. कपिल आणि समेध या दोघांच्या हालचाली संशयास्पद झाल्या. त्यामुळे वामन यांनी दुचाकीची डिकी उघडण्यास सांगितली. या दोघांनी नकार दिला. वामन यांनी डिकी उघडण्यासाठी कपिलकडे चावी मागितली. यावर कपिलेने वामान यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. समेध याच्या मालकीची ही दुचाकी होती. दुचाकीची डिकी उघडल्यावर त्यात कोयता आणि सुरी आढळून आले. याबाबत विचारणा केल्यावर दोघांनी वामन यांना अरेरावीची केली.

वामन यांनी दुचाकी आणि ही हत्यारे ताब्यात घेतली. या दरम्यान, सुमेध ऊर्फ दिंग्या पळून गेला. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीच्या आदेशचे उल्लंघन करणे आदी कलमान्वये हा गुन्हा नोंदविला आहे. कपिल याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी हत्यार ठेवलेली सुमारे 37 हजार 500 रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे. पळून गेलेला समेध याचा शोध सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)