व्यापाऱ्याला आठ लाखांना लुटले

नगर-औरंगाबाद रोडवर सिनेस्टाईलने रंगला लुटीचा थरार

लूट सिनेस्टाईलने लक्ष ठेवून!

चोरांनी ही लूट करताना व्यापाऱ्यावर लक्ष ठेवले आहे. त्यामुळेच त्यांना ही चोरी शक्‍य झाली आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर ही लूट सिनेस्टाईलने झाली आहे. चोरांनी व्यापाऱ्याला लुटायचे ठिकाण अगोदर निश्‍चित केले होते. त्यामुळेच एवढी मोठी लूट करणे चोरांना शक्‍य झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नगर  – शेवगावच्या व्यापाऱ्याने नगरमधून घेतलेले कापसाचे पेमेंट नगर-औरंगाबाद महामार्गावर चौघा चोरांनी लुटले. चोरांनी ही चोरी सिनेस्टाईलने लक्ष ठेवून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. व्यापाऱ्याचे सुमारे 8 लाख 45 रुपये 700 रुपये चोरांनी लुटून नेले. व्यापारी समीर वसंत दसपुते (वय 30, रा. बोधेगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी चौघा चोरांविरोधात लुटीचा गुन्हा नोंदविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यापारी समीर दसपुते व त्याचा मित्र रवींद्र शेळके हे नगरमध्ये कापसाचे पेमेंट घेण्यासाठी आले होते. ख्रिस्तगल्लीतून चेतन श्री नेटवर्क यांच्याकडून त्यांनी पेमेंट घेतले. दसपुते आण शेळके हे पेमेंट घेऊन मोटारीने बोधेगावकडे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गाने प्रवास करू लागले. दसपुते हे मोटारीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठलाग एक मोटार करत होती. त्यात चौघे जण होते. इमामपूर येथील मोकाकटे वस्तीजवळ या चौघा चोरांनी त्यांची मोटार दसपुते व शेळके यांच्या मोटारीला आडवी घातली. मोटार आडवी घालताच दसपुते आणि शेळके यांच्या दिशेने चौघा चोरांनी धाव घेतली. शेळके यांना चाकू लावून दसपुते यांना चोरांनी घेरले. मोटारीची काच फोडून झडती घेतली.

मोटारीच्या मागील सिटावर ठेवलेली बॅग चोरांनी उचलून त्याची तपासणी केली. या बॅगमध्ये रक्कम आणि हिशोबाची वही होती. चोरांनी ती ताब्यात घेऊन पळ काढला. या दरम्यान, चोरांच्या मोटारीचा क्रमांक दसपुते आणि शेळके यांनी टिपला. पोलिसांनी त्याची दखल घेतली असून, त्यानुसार चोरांचा तपास सुरू केला आहे. चोरांनी ही लूट लक्ष ठेवून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एमआयडीसी पोलीस खबऱ्यांकडून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)